देव मोगरा माता कहाणी माहिती | Devmogra Mata Mahiti | देवमोगरा माता सचित्र कहाणी |
याहा मोगी पुजन म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आदिवासी जमातीनी शोधलेला शेती महोत्सव.
देवमोगरा माता माहिती - Devmogra Mata jANKARI hINDI देवमोगरा माता कहानी गुजराती |
आदिवासी समाज पुवीॅपासुन निसर्गाला देव मानुन सण उत्सवाचे पुजन करत आला आहे निलीचारी, वागदेव, गव्हाणपुजन, (ओखडा), गांवदिवाळी, कणी (धान्य) पुजन, ओलीजोगण (होळी) इत्यादी सण-उत्सव निसर्गाचे प्रतिक असुन वास्तविक देव नसुन निसर्गातील ज्या -ज्या वस्तू प्रत्यक्षात जीवनात उपयोगी आले त्या -त्या
वस्तुला देव मानुन पुजन करत असतात. पुवीॅच्या काळापासून आदिवासींच्या अलिखीत परंतु मौखिक परंपरा आजही चालत आली आहे.
आदिवासी समाजात कोणताही सण उत्सव वर्षातुन एकदाच केला जातो. वर्षातुन होणारे सण उत्सव अबाधीत ठेवून मौखिक परंपरा जतन करण्याचे कार्य आदिवासी समाजातील पुजारा, बोडवा, मोडवी (आदिवासी इतिहासकार ) यानी आदिवासी सांस्कृतिक रितीरिवाज जतन करून ठेवले आहे.
दाब मंडळातील धरती वरील पहिले पंच | Devmogra Mata |
15 हजार वर्षांपूर्वी लोक जंगलात समुहाने फिरून भटके जीवन जगुन काढत होते. समुहाने भटकंती करून जंगलातील कंदमुळे, फळफुल इत्यादी खाऊन गुजराण करायचे. तेव्हा दाबमंडळातील प्रमु कोलपासा, गोर्याकोठार, देवगोंदारी, विन्यादेव, राजापांठा, तारहामहल, उमरावाणू, हेलबदेव, आगीपांडर, गिंबदेव यानी अथक परिश्रम करून जंगलातील सर्व प्रकारचे धान्य एकत्र गोळा करून त्यामधुन लोकांच्या उपयोगी येईल असे धान्य वेगळे केले.त्यानंतर ते धान्य दाब येथे सामुहिक शेती करून बी-बियाणे म्हणून कोठार भरून ठेवले. त्यानंतर या भुमीवर भटके जीवन व कंदमुळे खाऊन जीवन जगणार्या लोकांना बी-बियाणे कसे साठवून ठेवायचे, अन्न कसे शिजवुन खायचे, शेती कशी करायची, या भुमीवर व्यवहारी जीवन कसे जगायचे, रितीरिवाज व्यवहार शिकवले. जे या लोकांना हे सर्व ज्ञान माहिती नव्हते. त्यांच्या या महान शोधाच्या कारणांमुळे लोक त्याना देव समान पुजायला लागले. त्याना आपल्या कुळ सोबत जोडले. जे आज आपण कुलदैवत म्हणून पुजन करतो. देवमोगरा माता माहिती - Devmogra Mata jANKARI hINDI देवमोगरा माता कहानी गुजराती
हजारो वर्षांपूर्वी तापी व रेवा (नर्मदा)नदीच्या मध्ये दाब नावाचे राज्य होते. आजही तो परिसर हेलोदाब म्हणून ओळखले जाते. तेथे राजाकोलपासा याचे राज्य होते. दाब राज्याच्या भोवताली असलेल्या प्रमुखांना एकत्र आणून त्यानी मोठे राज्य स्थापन केले होते. त्याभागातील ताब्यात असलेल्या भुभागाला पाटी (खोंड) म्हणून ओळखले जात असे. दाब या सांस्कृतिक केंद्रस्थाना पासुन भोवताली चारही दिशांना आदिवासी बोली भाषेत खोंड (पाटी) म्हणून ओळखतात.त्याना नांवेही दिली आहे.
पुर्वेला निमाड पाटी, पश्चिमेला आंबुडापाटी, दक्षिणदिशेला देहवाल व मावचार पाटी, उत्तर दिशेला नाहाल व नोयरपाटी अशा प्रकारे नांवे त्याकाळी ठेवण्यात आली होती. देवमोगरा माता माहिती - Devmogra Mata jANKARI hINDI देवमोगरा माता कहानी गुजराती
या दाब मंडळात टुडोमोडवी, पेचरोपुंजारा,हेंगलोगुण्यो असे जाणकार मंडळी होती. कोलपासा,बाहगोर्या, देवगोंदारी, राजपांठा, विन्यादेव, आगीपांडर, पोरबदेव,सिडगोवा, देव सिनट, गिंबदेव हे दाब मंडळाचे प्रमुख होते. राजपांठा व विन्यादेव यांच्या राजगुरू वैदुभिलट व आंबुडापाटीचा प्रमुख राजातारहामहल,राजापांठाची आई उमरावाणू हे राज्य कारभारात सल्ला देत असे. दाबच्या राजाकोलपासा हे निमाड पाटीचे प्रमुख कुंदुराणा,देवकुंबाय, रेलाकबाड्या,आंबुडापाटीचे प्रमुख तारहामहल,देवभिलट, गाजळगोटा,देहवाल व मावचार पाटी प्रमुख देव निमजी, नोयरपाटीचे सिडगोवा,देववोरता या चारही पाटी प्रमुख यांची वर्षातुन एकदा मोठी सभा कोलदाब येथे घेत असत. त्या सभेला मोलहोबाय असे नांव होते.
मोलहोबाय सभेत चारही पाटीचे प्रमुख आपल्या जनतेच्या हिताचे महत्त्वाचे ठराव करीत असे.या प्रमुख पंचाच्या निर्णयाने दाब मंडळातील व्यक्तींना वेगवेगळे जबाबदारीचे काम सोपविले जात. त्यात बाहगोर्या याला दाबमंडळाच्या कोठार प्रमुख, राजासिडगोवा याला वसुलीचा प्रमुख म्हणून नेमले होते. राजपांठा व विन्यादेव हे सर्व प्रमुख पंचात अतिशय सामर्थ्यवान व बुध्दीमान असल्याने त्यांच्यावर संपूर्ण दाब मंडळाचे देखरेखीचे व सुरक्षेचे काम देण्यात आले होते. राजाकोलपासा नगरी हेलोदाब मध्ये बाहगोर्या,सिडगोवा, दोध्यावजीर,खेटापुजारा, टुडोमोडवी हे सर्व बाबाहेगवा, बाबाडुंगो, बाबाओढुवा, बाबाठोढगा, बाबा रोज्या, बाबाहाटो,बाबाखोगज्या,जाम्बुगढ,बाहाआंबाडा या दाब मंडळाच्या शिवरातील देवदेतांचे पुजन करायचे.त्यासाठी काकड झाडाचे पुजाकरून निसर्गाचे प्रतिक बनविले होते. देवमोगरा माता माहिती - Devmogra Mata jANKARI hINDI देवमोगरा माता कहानी गुजराती
कोलदाब: कोल म्हणजे पृथ्वीचा मध्य भाग | Devmogra Mata |
दाब म्हणजे खड्यांची जागा. दाब गावात पुर्वीच्या काळी राजापांठा व विन्यादेव यानी गांवदिवाळी साजरा केली. त्यावेळी नाचुन-नाचुन पाडलेली खड्डयाची जागा दाबली गेली म्हणून दाब नांव पडले.दाब मंडळाच्या कोठार प्रमुख बाहगोर्या यानी विन्यादेव, आगीपांडर(कणी), अनहोरीदेव, (मका)यांचे पालन पोषण केले होते. पुर्वीच्या काळी समुह शेती करण्याची प्रथा होती.त्याप्रमाणे बाहगोर्या यानी नवीन शेती केली व त्या शेतात कणी(ज्वारी)ची पेरणी केली.शेत निंदणीसाठी लाह्या(सामुहिक मदत)दाब मंडळातील प्रजेला मदतीसाठी बोलावले होते.लाह्यासाठी आलेल्या लोकांना जेवण व महुफुलाची दारू दिले.कणी (ज्वारी)जेव्हा पिकुन झाल्यावर कापल्यानंतर खळ व पांडर (धरती)पुजन राजापांठा याने केले. राजापांठा हा अतिशय बलवान व वेगवेगळ्या शस्त्र विद्येत प्रविण होता.तरूणपणी राजपांठा हा त्याच्या वडिलांच्या घाणीखुंट राज्यातील प्रजेला नेहमी मदत करीत असे.
राजापांठाला नऊ राण्या होत्या. त्या देवरूपण, देवकाटण, देवमुरखु, देवकुपल, मांडववोरही, हेलीवोडल, आगीपांडर, फुलमोगरा यापुर्वीच्या आठ राण्या होत्या. ईकडे हेलोदाब येथे रेलानकेला देवी व पांग्यावणजी यांच्या घरात याहामोगीच्या जन्म झाला होता. याहामोगीला मोगीपेंडरी, आगीपांडर,कणी, अनहोरीदेव, निसबकसबदेव कुयटीआथुटी, उरतीनपुरतीदेवी ही भाऊ बहिण होते. याहामोगी वयात आल्यावर राजापांठाने तिला लग्नाची मागणी घातली. परंतू राजापांठाला पुर्वीच्या आठ राण्या होत्या.तो केवळ आपल्या सौंदर्यावर मोहिते होऊन आपल्याशी लग्न करू इच्छितो, असे वाटल्याने राजापांठाला घर जावई म्हणून दाबच्या राजाकडे राहण्याची अट घातली.आपल्या पुर्वीच्या आठ राण्या असुन देखील याहामोगीला प्राप्त करण्यासाठी दाबच्या राजाकडे सातवर्षे घरजावई म्हणून राहिला सात वर्षांच्या सेवाकाळ पुर्ण केल्या नंतर ते दोघेही घाणीखुंट येथे राहुन जीवन जगावयाचे ठरविले.परंतु त्याना राजा तारहामहल यानी घरात घेतले नाही.राजपांठा व याहामोगी अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करीत जंगलात भटकत राहीले. त्यानंतर त्यानी देवमोगरा गांव बसविले.व दोघे तेथे एक झोपडीवजा घर बांधून राहु लागले. त्या कालावधीत बारा वर्षाचा दुष्काळ पडला. दाब मंडळातील व परिसरातील प्रदेशातील लोकांची गुरेढोरे मरण पावली.बरेच लोक या दुष्काळात मरण पावले व काही लोक आपली घरेदारे सोडून निघुन गेले. दाब मंडळातीला राज्ये उजाड सारखे झाले.या कालावधीत याहामोगीने उपासमारीने हैराण झालेल्या लोकांना भरपुर अन्नधान्य व पशुधन दिले. देवमोगरा माता माहिती - Devmogra Mata jANKARI hINDI देवमोगरा माता कहानी गुजराती
लोकांना भाकरीसाठी अन्नधान्य व पशुधन पुरविले म्हणून दाब मंडळातील प्रजा "याहा "मानु लागले. आदिवासी मध्ये याहा म्हणजे आई व मोगी म्हणजे किंमत करू शकत नाही. आदिवासी भिलीभाषेत धरती (याहामोगी)पांडरला मोढीयाहा, कणी(धान्य) कणीकसरीला हानीयाहा सांगतात.असे सांगितले जाते की, धरती(पांडर)चे दुध पिऊन हानीयाहा कणी(धान्य) मोठी होत असते व हानीयाहा (कणी)चे दुध पिऊन आपण जगत आहोत. ज्यामुळे आपली उत्पत्ती व जीवन या सृष्टीवर आहे.
देवु होरो | Devmogra Mata |
महुची दारू या धरतीवर राजपांठा विन्यादेव यानी पुर्वीच्या काळी महुफुलापासुन दारू बनविली. त्याला आदिवासी बोली भाषेत "होरो"म्हणतात. ही दारू (होरो) आदिवासी समाज सण- उत्सव,सुख-दु:खाच्या वेळेस देवी-देवतांना नैवैद्य देऊन पुजा केली जाते. होरो(दारू) पवित्र मनाने बनवावी लागते. ती दारू देवु होरो सांगतात. ती दारू बनविण्यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तीला पवित्र मन,वचनने सज्ज राहावे लागते. देवमोगरा माता माहिती - Devmogra Mata jANKARI hINDI देवमोगरा माता कहानी गुजराती
त्यासाठी नदीवर जाऊन डोक्यात दही व बेलपानाने आंघोळ करावी लागते.त्यानंतर घरी येऊन पुजा करून माठामध्ये महुफुले टाकावे लागतात. पाच दिवसात महुफुलाची दारू बनवितात. ज्यादिवशी याहामोगी पुजनासाठी जायचे असेल त्यादिवशी बोत (मातीचे भांडे) मध्ये होरो (दारू ) भरतात त्या बोतला हिदारी (बांबूची टोपली ) मध्ये कणी (धान्य) सोबत ठेवतात. आदिवासी समाजात अशी कहानी आहे की,राजपान्डो देवकालाव (मोर) बनुन बांबुच्या फांदीवर बसुन आवाज देतो तेव्हाच पाऊस येतो.तसेच जेव्हा याहा कणी (धान्य)रूपात होती तेव्हा बांबुच्या मुळात (बुंधा) लपली होती. तिला टुडाबोडवा, पेचरापुंजारा, हेंगलागुण्या या दाब मंडळातील जाणकार पंचानी शोधुन काढली होती. याहा (कणी)ला बांबुचे घर पसंत होते. म्हणून आदिवासी समाजात कणी (धान्य) बांबूच्या कणगी (कोठी) , मातीच्या बोदडी (कोठी) मध्येच ठेवतात. ज्यामुळे याहामोगी सुखी असते.त्यामुळे कुलदेवीला नवस करण्यासाठी शेतात पिकलेली कणी (धान्य) बांबूच्या टोपली (हिदारी) मध्ये ठेवुन वाजत गाजत घेऊन जातात.
Devmogra Mata Sanpurn Darshan- Hindi Video >>> देवमोगरा माता दर्शन नर्मदा
याहामोगी पुजन परंपरा | Devmogra Mata |
Devmogra Mata Hindi Full Story- >> जानिये देवमोगरा माता कोण थी?
शेतातील धान्य पिकल्यावर आपल्या शेतातील कणी(धान्य)एक टोपली मध्ये भरून दर वर्षी दाब मंडळातील निमाडपाटी, आंबुडापाटी, देहवाल व मावचारपाटी,नोयरपाटी व नाहालपाटी या प्रदेशातील प्रजा देवमोगरा गांवी आमावस्ये (खुट्टा) च्या दिवशी सामुहिक (होब) एकत्र होऊन शेताच्या व धान्या (कणी) च्या शोध लावलेल्या आपल्या देवी देवतांचे पुजन तसेच त्यानी तयार केलेल्या कोठार मध्ये धान्य बियाणे स्वरूपात ठेवण्यासाठी जेव्हा भविष्यात दुष्काळ पडला तर हे साठवुन ठेवलेले बियाणे परत मिळेल. या आशेने कोठार मध्ये जमा करत होते.
ही परंपरा 15 हजार वर्षांपूर्वीची असुन ती परंपरा आजही चालत आहे. जे आज आपण हिदारी स्वरूपात आणत असलेल्या टोपलीतील विविध प्रकारचे धान्य (कणी) पुजन करताना पाहतो. याहामोगीची पुजा हिदारी, कणी, महुफुलाचा दारूने होते. आदिवासी समाजातील कोणत्याही देवीदेवता याना फुल-हार, अगरबत्ती, नारळ, सेंदुर चढवला जात नाही. कथा ही आहे की, याहामोगी धनधान्य, फळ, फुल, वृक्ष, पान, कंदमुळे, कणी कनसरीचा विविध रूपात धरती पोटी जन्म घेतला आहे. त्यामुळे या धरतीवर पान, फुल, फळ हे परिपक्व होण्या अगोदर तोडुन टाकणे प्रकृति विरुद्ध आहे. आदिवासी समाजाची ही परंपरा हजारो वर्षांपूर्वीची असुन आदिवासी समाजाचे दाब मंडळातील देवीदेवता याना नवीन धान्य अर्पण करणे व परंपरा जीवंत ठेवण्यासाठी उत्सव आहे.आदिवासी समाजातील वैभवशाली, मौखिक, सांस्कृतिक पुर्वापार रूढीपरंपरा चालत आली आहे. त्या संस्कृति व कणीच्या उगम दाब येथुन झाला आहे. तीच संस्कृति आदिवासी समाजात रूढ झाली ती आजही कायम आहे. देवमोगरा माता माहिती - Devmogra Mata jANKARI hINDI देवमोगरा माता कहानी गुजराती
संकलन:- करमसिंग पाडवी रा. काठी, तालुका अक्कलकुवा नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र - 7744094923 व प्रकाशक आदिवासी टिव्ही इंडिया...
Good dada
ReplyDeleteKathi sarkaru history akhi dev ta khup haro aju