Hot Widget

Type Here to Get Search Results !

बोरखेडा बाल हत्याकांड प्रकरणी बीकेडी चे निवेदन; कठोर शिक्षेसह 25 लाखांच्या मदतिची मागणी

बोरखेडा बाल हत्याकांड प्रकरणी बिरसा क्रांती दलाचे निवेदन,, नराधमांना तात्काळ फाशीच्या शिक्षेची मागणी! पिडीत कुटुंबाला 25 लाखांच्या आर्थिक मदतिची केली मागणी

प्रतिनिधी, शिरपूर: जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील बोरखेडा गावी चार दिवसांपूर्वी झालेल्या अमानुष बाल हत्याकांडाचा बिरसा क्रांती दलाकडून निषेध व्यक्त करत, आरोपिंना तात्काळ फाशीची मागणीसह पीडित कुटुंबाला 25 लाख रूपयांच्या अार्थिक मदतिची मागणी मुख्यमंत्र्यांकडे तहसिलदारांमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे बिरसा क्रांती दलाने केली. 
बोरखेडा बाल हत्याकांड प्रकरणी बिरसा क्रांती दलाचे निवेदन,, नराधमांना तात्काळ फाशीच्या शिक्षेची मागणी! पिडीत कुटुंबाला 25 लाखांच्या आर्थिक मदतिची केली मागणी

राज्यासह देशाला सुन्न करणाऱ्या या अमानवी घटनेचा प्रथमत:बिरसा क्रांती दलाकडून निषेध नोंदवण्यात आला. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे जागली करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन भावंडांचा रात्री कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आला होता. मुलांचे आई - वडील मध्य प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेले असतांना ही निंदनीय घटना घडली. या हत्याकांडापूर्वी 15 वर्षीय मुलीसोबत अत्याचार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवेळी आदिवासी कुटुंबावर या घटनेमुळे आभाळ कोसळले आहे. या हत्याकांडामागिल नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्याच्या मागणीसह पीडित कुटुंबाला 25 लाखांच्या आर्थिक मदतिची मागणी बिरसा क्रांती दलाने मुख्यमंत्री यांना तहसिलदारांमार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज पावरा, जिल्हा महासचिव वसंत पावरा, जिल्हा सल्लागार विलास पावरा, बीकेडी चे तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, उपाध्यक्ष सखाराम पावरा, उपाध्यक्ष समाधान ठाकरे, सचिव गेंद्या पावरा, संपर्क प्रमुख विजय पावरा, प्रसिद्धि प्रमुख मद्रास पावरा, अत्तरसिंग पावरा काकड्या पावरा, योगेश पावरा, गोरख भिल आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.