Hot Widget

Type Here to Get Search Results !

अंगणवाडी सेविका, मदनिसांची पदे तात्काळ भरण्याची बिकेडिची मागणी

शिरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदनिसांची पदे तात्काळ भरणेसह पर्यवेक्षिकेपदी अज च्या महिलांची नियुक्ति प्राधान्याने करण्याची बीकेडी ची मागणी

शिरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदनिसांची पदे तात्काळ भरणेसह पर्यवेक्षिकेपदी अज च्या महिलांची नियुक्ति प्राधान्याने करण्याची बीकेडी ची मागणी

शिरपूर, प्रतिनिधी दि.०१: महिला व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची आदिवासी भागातील रिक्त पदे स्थानीक अनु. जमाती महिलांमधून तात्काळ भरण्याची मागणी बिरसा क्रांती दलाने बीडीओ व सीडीपीओ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात शिरपूर तालुका नवसंजिनवी योजनेत असल्याने केंद्र व राज्य शासनाचे निर्देश व पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासी महिला व बालकांचा विकास घडवून आणणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने तालुक्यातील आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची रिक्त पदे स्थानिक अनु. जमाती महिलांमधून तात्काळ भरण्याच्या मागणीसह सांगवी बीटसह अन्य आदिवासी भागातील अंगणवाडी बीट पर्यवेक्षिका या अनु. जमाती महिलांमधून प्राधान्याने नियुक्त करण्याची मागणी बिरसा क्रांती दलाकडून करण्यात आली.

निवेदनात पर्यवेक्षिका नियुक्तीबाबत कार्यालयाकडून पेसा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. सदर मागणीचे निवेदन बीडीओ, सीडीपीओ यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. धुळे व महिला बालविकास सभापती धुळे यांनाही देण्यात आले. निवेदनावर बिरसा क्रांती दलाचे जिल्हा महासचिव वसंत पावरा, जिल्हा सल्लागार विलास पावरा, सल्लागार दिलीप पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, सचिव गेंद्या पावरा, सहसचिव मन्साराम पावरा, प्रसिद्धि प्रमुख मद्रास पावरा, संघटक काकड्या पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.