धुळे, शिरपुर : शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान, शिवसेना शाखा नामफलक अनावरण, नवमतदार नोंदणी तसेच पक्षप्रवेश सोहळा धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघात आदिवासी भागातील वासर्डी गावात संपन्न झाला. शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण धुळे आणि नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख श्री.अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख श्री.हेमंत रावसाहेब साळुंके, श्री.हिलालअण्णा माळी, श्री.अतुल श्रीवर्धनकर उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, महिला आघाडीच्या सौ.ज्योतीताई पाटील, सौ. वीणा वैद्य शिरपूर तालुका प्रमुख श्री.अत्तरसिंग पावरा, श्री.दीपक चिरमुले, तालुका संघटक श्री.योगेश सूर्यवंशी, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीश देसले, मा.तालुकाप्रमुख श्री.विश्वनाथ पाटील, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, श्री छोटू पाटील, विभाभाई जोगराणा, शिरपुर शहरप्रमुख श्री.मनोज धनगर आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, गोरगरिबांना न्याय देणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना आहे इथे सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला मान दिला जातो. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी गरीब घरातील शिवसैनिकांना मानाचे स्थान दिले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक समाजपयोगी निर्णय घेतल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
शिरपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी सामान्य जनतेत मिसळून काम करावे, निश्चितपणे आगामी काळात शिवसेनेला यश मिळेल. यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनीही मार्गदर्शन केले, तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा आणि दीपक चिरमुले यांनी तालुक्यातील विविध समस्या मांडल्या तालुक्यातील प्रश्नांबाबत लवकरच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अब्दूल सत्तार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही थोरात यांनी ग्रामस्थांना अश्वस्त केले. शिवसैनिकांनी संपूर्ण गावच भगवे झेंडे लावुन भागवामय वातावरण निर्माण केले होते.