![]() |
Kodid Grampanchayat Shirpur |
कोडीद येथे आरोग्य उपकेंद्रात NCD Camp यशस्वीरित्या संपन्न.! NCD Camp successfully held at Health Sub Center at Kodid!
प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र कोडीद येथे आज दि.१९/०१/२०२०, मंगळवार रोजी कोडीद Sub Centre अंतर्गत येणाऱ्या कोडिद ग्रामपंचायतीतील गावांसाठी NCD Camp(Non Communicable Diseases Camp) आयोजित करण्यात आला.
ह्यावेळी उपस्थित मान्यवरांनी सबंधित शिबिराचे महत्व व शिबिराचे भविष्यासाठी नियोजन ह्यावर मार्गदर्शन केले. ह्यावेळी मार्गदर्शक म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी(THO) डॉ.प्रसन्न कुलकर्णी सर व प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे वैद्यकीय अधिकारी मा.श्रीमती डॉ.निलीमा देशमुख मॅडम हे होते तसेच डॉ.चेतना महाले मॅडम, डॉ.अनंत पावरा सर, डॉ.हिरा पावरा सर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आयोजित झाले. Kodid Grampanchayat Shirpur
ह्यावेळी कोडीद उपकेंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, ANM श्रीमती प्रमिला गिरासे, MPW श्री.नेटके, गतप्रवर्तक ज्योती पावरा व उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या आशा कार्यकर्ती ह्यांच्या नियोजनाने व उपस्थितीने सदर शिबिराचे सफतलतापूर्वक आयोजन झाले.
ह्यावेळी उपस्थितांचे उपकेंद्र कोडीद चे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी आभार मानले.