Hot Widget

Type Here to Get Search Results !

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार– शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार– शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड: 10 - 12 Standard Exam Time Notification Maharashtra Board
10-12 Standards Board Exam Notification

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार– शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड: 10 - 12 Standard Exam Time Notification Maharashtra Board

मुंबई: राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 'या' वेळेत होणार; आठवी-नववीच्या परीक्षांबाबत 'हा' झाला निर्णय!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठे संकट कोसळले आहे. हा काळ बोर्डाच्या परीक्षेचा आहे. त्यामुळे दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? याबाबत संभ्रम आत्तापर्यंत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या देखील मनात होता. 

मात्र, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता हा गोंधळ मिटवला आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? आणि त्याचा पॅटर्न कसा असणार याविषयी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच ऑफलाईन होणार असल्याचे सांगितले आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात किंवा पद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आठवी, नववी या वर्गाच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारल्यानंतर, या प्रश्नाचे उत्तर देताना देखील त्यांनी लवकरच याबाबत निर्णय घेऊ. कारण, कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची आरोग्य सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे आणि तिलाच राज्य सरकार आणि शिक्षण विभाग प्राधान्य देत आहे, असे सांगितले आहे.

साधारणतः मार्च मध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू होतात. मात्र पेपर सेटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली असते. गाव खेड्यांपर्यंत हे पेपर जायला निदान दोन महिन्याचा कालावधी लागतो. ऑगस्ट मध्ये आम्ही सिलॅबस कमी करण्याचं काम केलं असं देखील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

या अभूतपूर्व कालखंडामध्ये परीक्षा होणार असल्याने आता तज्ञांशी सल्लामसलत करून येणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शनाचे स्वागत आहे त्याच बरोबर सर्व खबरदारी घेऊन परीक्षा घ्यावयाच्या आहेत. त्यानुसार, आता विचार सुरू असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.