Hot Widget

Type Here to Get Search Results !

आदिवासी बांधवांसोबत कृषीमंत्री दादा भुसेयांनी घेतला जेवणाचा आस्वाद!

आदिवासी बांधवांसोबत कृषीमंत्री दादा भुसेयांनी घेतला जेवणाचा आस्वाद!

आदिवासी बांधवांसोबत कृषीमंत्री दादा भुसेयांनी घेतला जेवणाचा आस्वाद!

धुळे: महाडिबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान 2020-21 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावीत, चैत्राम पवार उपस्थित होते.

यावेळी देशबंधु ॲग्रो रिसर्च कंपनीच्या आढावा बैठकीत कंपनीच्या कामकाजाचाही मंत्री श्री.भुसे यांनी आढावा घेतला. 

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा आज वाढदिवस असल्याचे औचित्य साधत आदिवासी महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मंत्री श्री.भुसे यांनी शेतकरी सोमनाथ चौरे व मोतीराम पवार यांच्या शेतशिवाराची पहाणी केली. 

आदिवासी बांधवासोबत मंत्री श्री.भुसे यांनी जेवणाचाही आस्वाद घेतला. राज्याचे कृषी मंत्री त्यांच्या वाढदिवशी थेट आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतशिवाराची पहाणी करत शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या मंत्र्याचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा यावेळी दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.