महाशिवरात्री: कोडिद यात्रा रद्द २०२१ |
कोडीद महाशिवरात्री यात्रोत्सव कोराना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रद्द.!
बोराडी: शिरपूर तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील कोडीद येथील प्रसिध्द यात्रोत्सव म्हणून गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेली महाशिवरात्री यात्रोत्सव नावारूपाला आहे. यात्रोत्सवात महाशिवरात्री निमित्त भगवान शिवची महापूजा, महाआरती होत असते. या यात्रोत्सवात उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच अनेक ठिकाणाहून व्यापारी येत असतात. दोन दिवस चालत असलेल्या ह्या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असते.
यंदा येत्या ११ मार्च रोजी सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री होत असते पण यावर्षी कोरोना माहामारीच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या निदर्शनामुळे रद्द करण्यात येत आहे. यादिवशी होत असलेली भगवान शिवची महाआरती, पूजा, रथोत्सव मात्र कोविड-१९ चे नियम पालन करून होणार आहे.
सूचना व नियम सर्व व्यापारी, परिसरातील व गावातील यात्रेकरूंना लागू होईल अशी सूचना समस्त बैठकीत ठरविण्यात आली. ही सूचना गावातील समस्त गावकऱ्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले यावेळी पोलीस पाटील, पंचमंडळी, प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच भरत पालरा, माजी जि.प. सदस्य प्रकाश पावरा, डॉ. हिरा पावरा सामाजिक कार्यकर्ते आकाश पावरा व आदी गावकरी एकत्र येऊन ठरवून घेतली.