Hot Widget

Type Here to Get Search Results !

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषण कोण लिहून देतं?, किती आहे खर्च; आरटीआयमधून झाला उलगडा

Who writes the speech for Prime Minister Narendra Modi ?, how much is the cost;  Unravel from RTI पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषण कोण लिहून देतं?, किती आहे खर्च; आरटीआयमधून झाला उलगडा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य भाषण कोण लिहते?

Who writes the speech for Prime Minister Narendra Modi ?, how much is the cost;  Unravel from RTI पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषण कोण लिहून देतं?, किती आहे खर्च; आरटीआयमधून झाला उलगडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत Narendra Modi Prime Minister of India नवी दिल्ली: आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर देशासह संपूर्ण जगावर भुरळ घालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविषयी सर्वसामान्यांना नेहमीच कुतुहूल असतं. पॉझिटव्ह विचार, संदर्भ, संत-विचारवंतांचे कोट्स आणि साधीसोपी भाषा हे मोदींच्या भाषणाचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे मोदी स्वत: हे भाषण लिहितात की त्यांना दुसरं कोणी भाषण लिहून देतं, असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतो. आता याबाबतचं रहस्य उलगडलं आहे. एका आरटीआयमधून त्यावर प्रकाश पडला आहे. (Who writes Narendra Modi’s speeches?)

भाषण कोण लिहितं? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य भाषण कोण लिहते

मोदींचं भाषण कोण लिहून देतं? यावर मात्र पंतप्रधान कार्यालयाने भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी कोणत्या इव्हेंट म्हणजे कार्यक्रमात भाग घेणार आहे, त्यावर त्यांचं भाषण अवलंबून असतं. कार्यक्रम काय आहे? त्याचं स्वरुप काय आहे त्यावर विविध विभागातील अधिकारी, संस्था, विभाग, संघटना पंतप्रधानांना इनपुट देत असतात. मोदी हे सर्व इनपुट वाचून त्या आधारे आपलं भाषण तयार करतात, असं पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

खर्च अजूनही गुलदस्त्यात:

एका वृत्तसंस्थेने पंतप्रधान कार्यालयात आरटीआयच्या माध्यमातून पंतप्रधानांचे भाषण कोण लिहून देतो आणि त्यावर काय खर्च येतो, अशी माहिती विचारली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. पण मोदींच्या विविध प्रसंगी होणाऱ्या भाषणांवरील खर्चाची माहिती देण्यात आलेली नाही. विविध स्त्रोतांकडून इनपुट मिळाल्यानंतर मोदी भाषणाला अंतिम स्वरुप देतात असं या उत्तरात म्हटलं आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणावर किती खर्च येतो हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

नेहरुंच्या काळातील पद्धत आजही सुरू: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य भाषण कोण लिहते

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून ते मोदींपर्यंत पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणासाठी पार्टी युनिट्स, विविध मंत्रालये, संबंधित विषयाचे तज्ज्ञ, पंतप्रधानांसाठी काम करणारी खासगी टीम आदी भाषणांचे इनपुट देत असतात. नेहरूंच्या काळापासूनची ही पद्धत आजही सुरू आहे, असंही आरटीआयच्या उत्तरात म्हटलं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाषण लिहिण्यासाठी नेहरू खूप वेळ घ्यायचे. मात्र, मोदी भाषण तयार करण्यासाठी वैयक्तिक किती वेळ देतात याची माहिती देण्यात आलेली नाही.

भाषण आणि मोदी: Who writes the speech for Prime Minister Narendra Modi ?, how much is the cost;  Unravel from RTI भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य भाषण कोण लिहते

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध प्रसंगाच्या अनुषंगाने नेहमीच जनतेशी संवाद साधतात. जनतेशी सातत्याने संवाद साधून जनतेसोबतची कनेक्टिव्हीटी कायम राहण्यावर त्यांचा भर असतो. संरक्षण, आरोग्य, शिक्षण अर्थसंकल्प आदी विषयांवरही ते जनतेशी संवाद साधून सोप्या भाषेत जनतेला अर्थसंकल्प समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. सरकारचा ताळेबंद सांगतानाच जनतेच्या फायद्याचं त्यात काय आहे, याची माहिती देण्यावरही त्यांचा भर असतो. त्याशिवाय विविध राज्य, देशांच्या दौऱ्यातही भाषण देऊन जनतेशी संवाद साधण्यावर त्यांचा भर असतो. विद्यार्थी असो की शेतकरी, गृहिणी असो की आंतरराष्ट्रीय संमेलन सर्वांशी संवाद साधण्यावर त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असतो. ‘मन की बात’ कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.