Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यात लवकरच पीएसआय पदाच्या ‘इतक्या’ जागांसाठी होणार भरती

राज्यात लवकरच पीएसआय पदाच्या ‘इतक्या’ जागांसाठी होणार भरती  मुंबई ।: राज्य लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra State Public Service Commission) गेली दोन वर्षे परीक्षा झालेली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. तसेच एमपीएससीमार्फत (MPSC) पदभरतीसाठी परीक्षेची जाहिरात तब्बल दोन वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला वेग देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध सरकारी विभागांना रिक्त पदांचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध विभागाची मागणीपत्र एमपीएससीला प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे मागणीपत्र आयोगाला मिळाले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी भरती केली जाईल. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जागा कमी काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.दरम्यान  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली होती. राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारकडून घेण्यात आला आहे.
PSI Recruitment Maharashtra 2021 - 2022

राज्यात लवकरच पीएसआय पदाच्या ‘इतक्या’ जागांसाठी होणार भरती


मुंबई ।: राज्य लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra State Public Service Commission) गेली दोन वर्षे परीक्षा झालेली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. तसेच एमपीएससीमार्फत (MPSC) पदभरतीसाठी परीक्षेची जाहिरात तब्बल दोन वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला वेग देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध सरकारी विभागांना रिक्त पदांचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध विभागाची मागणीपत्र एमपीएससीला प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे.

यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे मागणीपत्र आयोगाला मिळाले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी भरती केली जाईल. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जागा कमी काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.दरम्यान  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली होती.

राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारकडून घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.