Anganwadi Sevika Bharti | अंगणवाडी सेविकाची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा | Dhule Anganwadi Bharti 2022
एकात्मिक बालविकास सेवा योजना, Integrated Child Development Services Scheme प्रकल्प पिंपळनेर, ता. साक्री यांच्या अंतर्गत रिक्त अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 30 डिसेंबर 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील, असे बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
पिंपळनेर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीसांची 15, तर मिनी अंगणवाडी सेविकेचे एक, अशी एकूण 16 पदे रिक्त आहेत. त्यासाठी ही भरती प्रक्रिया होईल. मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदांचा तपशील असा (अनुक्रमे ग्रामपंचायत/पाड्याचे नाव, अंगणवाडी केंद्र, रिक्त पदांची संख्या प्रत्येकी एक) : बोपखेल, भोरटीपाडा. मदतनीस रिक्त पदांचा तपशील असा : पिंपळनेर- नाना चौक, इदगाव पाडा-1. टेंभा प्र. वार्सा- दळूबाई गावठाण. शेवगे-शेवगे- 1. शेवडीपाडा- शेवडीपाडा- 1. कुडाशी- महुबंद, बंधारपाडा. वार्सा- सीताडी. खरगाव- खरगाव, पारसरी. बसरावळ- बसरावळ. प्रतापपूर- प्रतापपूर- 3. देगाव- देगाव. शेणपूर- शेणपूर 1. नवडणे- नवडणे 1. एकूण 15.
याबाबतच्या अटी व शर्थींची माहिती संबंधित ग्रामपंचायत, गाव, पाडे तसेच प्रकल्प कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही प्रकल्प अधिकारी श्रीमती बनसोडे यांनी म्हटले आहे.
Anganwadi Bharti 2022 – अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती |
Keshav pawar
ReplyDelete