उपकेंद्र, कोडीद येथे आज मानव विकास कॅम्प व सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा.!
शिरपुर तालुका धुळे- दि. १५ रोजी उपकेंद्र, कोडीद येथे सिकल सेल जनजागृती सप्ताह शिबीर घेण्यात आले.
ह्यावेळी धन्वंतरी पूजन करून कार्यक्रम घेण्यात आले. तसेच, आज रोजी प्रा.आ.केद्र बोराडी अंतर्गत उपकेंद्र, कोडीद येथे मानव विकास कॅम्प आयोजित करण्यात आला त्यात
एकुण गरोदर माता ६१, ० ते ६महिने बालके ११, ६महिने २ वर्ष बालके १२ ह्यांची तपासणी करण्यात आली.
ह्यावेळी उपस्थितांना प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत पावरा, उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी मागदर्शन केले.
ह्यावेळी आरोग्य सेवक श्री. नेटके, आरोग्य सेविका सौ. प्रमिला गिरासे, गटप्रवर्टक, आशा कर्मचारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उपकेंद्र, कोडीद येथे आज मानव विकास कॅम्प व सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा.! |