Hot Widget

Type Here to Get Search Results !

'ड" यादी कशी पाहायची | शबरी आवास योजना | घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची? | प्रधानमंत्री आवास योजना |

शबरी आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजना | ग्रामीण : घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची?

नवी दिल्ली - तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं साल 2020-21मधील लाभार्थ्यांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे.

घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्या त्या लाभार्थ्यांचं नाव जाहीर केलं जात आहे. जसं जसं लाभार्थ्यांची नावं मंजूर होतील, तसंतशी त्यांची नावं या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

पण, ही यादी कशी पाहायची, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण काय आहे. याचीच माहिती आपण पाहणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण | शबरी आवास योजना | घरकुल योजना महाराष्ट्र | 

2022 पर्यंत देशातल्या सगळ्यांना घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं भारत सरकारनं 2016मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत देशभरात 2 कोटी 95 लाख घरं बनवण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे.

या योजनेअंतर्गत 25 स्क्वेअर मीटरचं घर बांधता येतं. घर बांधण्यासाठी महाराष्ट्रासारख्या मैदानी राज्यात 1लाख 20 हजार, तर हिमाचलसारख्या पर्वतीय राज्यांमध्ये 1 लाख 30 हजार रुपये मदत दिली जाते. ही मदत लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.

मैदानी राज्यांसाठी 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देतं, तर पूर्वेकडील राज्यात 90 टक्के निधी केंद्र तर 10 टक्के निधी राज्य सरकार देतं.

याशिवाय स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधीही उपलब्ध करून दिला जातो.

घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते. ही यादी कशी पाहायची याची माहिती आता पाहू.

लाभार्थी यादी कशी पाहायची?

  1. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला pmay.nic.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Pradhan Mantri Awaas Yojana - Gramin नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. Pradhan Mantri awaas Yojana- Gramin, Guidelines आणि Cirulars असे तीन पर्याय तुम्हाला तिथं दिसतील.
  2. यापैकी पहिल्या म्हणजेच Pradhan Mantri awaas Yojana- Gramin या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  3. यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची वेबसाईट ओपन होईल.
  4. यामध्ये तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालयाचं किती घरकुलांचं उद्दिष्ट आहे, त्यासाठी किती जणांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी किती प्रस्ताव मंजूर झाले आहेत, त्यापैकी किती घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत आणि त्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, याची माहिती दिसेल.
  5. आता तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला असेल तर ते मंजूर झालं की नाही ते कसं पाहायचं त्याची माहिती पाहूया.
  6. यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला असलेल्या Awaassoft या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे report. यावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं वेगवेगळे रिपोर्ट दिलेले तुम्हाला दिसून येतील. त्यातील सगळ्यात शेवटच्या Social Audit Reports मधील Beneficiary details for verification यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  7. त्यानंतर तुमच्यासमोर MIS Report नावाचं एक पेज ओपन होईल. यापेजवर selection filters या पर्यायाखालील एक एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. Filters
  8. सुरुवातीला राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालुका आणि सगळ्यात शेवटी गाव निवडायचं आहे. हे निवडून झालं की मग तुम्हाला कोणत्या वर्षीची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे.
  9. आता आपल्याला 2020-21 या वर्षातील लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे त्यामुळे आपण 2020-21 हे वर्ष निवडलं आहे.
  10. त्यानंतर कोणत्या योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे ती योजना निवडायची आहे.
  11. इथं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, All central schemes, All states schemes, राजीव गांधी आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना...अशा दिलेल्या योजनांपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे.
  12. आता आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या योजनेतील यादी पाहायची असल्यानं आपण ती योजना निवडली आहे.
  13. त्यानंतर समोर दिलेल्या बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचं उत्तर कॅप्चाच्या रकान्यात टाकायचं आहे.
  14. आणि मग सगळ्यात शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  15. त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी ओपन होईल.

याप्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कोणत्या योजनेअंतर्गत कुणाला घरकुल मंजूर करण्यात आलं, याची माहिती पाहू शकता.

शबरी आवास योजना | घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची? | प्रधानमंत्री आवास योजना |
शबरी आवास योजना | घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची? | प्रधानमंत्री आवास योजना |

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.