Hot Widget

Type Here to Get Search Results !

भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, यात शिक्षकाचा मृत्यू | आठवड्यातील दुसरी दुर्देवी घटना | Road Accident Shirpur |

भरधाव डंपरने समोर चालणाऱ्या मोटरसायकलीला धडक देत मोटरसायकलवरील दोघांना चिरडल्याची घटना आज दि ४ रोजी दुपारी १२ :४० वाजेच्या सुमारास घडली आहे.या अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे....Road Accident Shirpur

ह्याच रस्त्यावरील या आठवड्यातील दुसरी घटना...

रस्ता खराब असल्याने होत आहेत अपघात....

Adivasi TV India | बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर)  वाघाडी- बोराडी रस्त्यावर आज दि ४ रोजी दुपारी १२ : ४० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. हया डंपर  एम.एच.१२ एच.डी.०२२९ बोराडी होऊन शिरपूर कडे खड्डी भरून  जात होते.तर  एम.एच.३९ पी. ०६४० मोटरसायकल मलफा ता.पानसेमलहुन बोराडी मार्गे शिरपूर जात होते. घाटाखाली रस्ता खराब असल्याने मोटरसायकल हळु चालत होती तर मोटरसायकलच्या मागून येणाऱ्या  डंपर भरधाव वेगाने समोरील मोटारसायकलला जोरदार धडक दिली यात मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच आठवड्यात घाटी परिसरात अपघातातील ही दुसरी मोठी घटना आहे या परिसरातील रस्ता  जास्त प्रमाणात खराब असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे व नाहक वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, यात शिक्षकाचा मृत्यू | आठवड्यातील दुसरी दुर्देवी घटना | Road Accident Shirpur |
भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, यात शिक्षकाचा मृत्यू | आठवड्यातील दुसरी दुर्देवी घटना | Road Accident Shirpur |

      हयात शहादा येथील अमृत दयाराम बोरसे वय ५० व नामदेव तुकाराम पाटील वय ५५ रा.मलफा ता.पानसेमल हे दोघेही जण मोटरसायकलीने बोराडीमार्गे शिरपूरकडे जात असतांना बोराडी नांदर्डे गावादरम्यान घाटाच्या खाली भरधाव डंपरने मोटरसायकलीला मागून धडक देत दोघांना चिरडल्याची घटना घडली यात नामदेव पाटील व अमृत बोरसे या दोघांना जागीच मृत्यू झाला.दोघांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.

      अपघात ईतका भयानक होता की मागून येणाऱ्या डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक देऊन मोटर सायकल वर डंपर येऊन बराच अंतर पर्यंत मोटरसायकल फरफटत नेली व रस्त्याच्या कडेला जाऊन डंपर पलटी झाली या डंपर मध्ये मोटरसायकल पूर्णतः अडकल्याचे दिसून आले.  अपघातातील मृतांची अवस्था भयानक होती पाहिल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत होती. सदर अपघातातील डंपर हे बोराडी येथील् असून अपघात झाल्यानंतर डंपरचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला आहे.

     अपघाताची माहिती मिळताच बोराडी येथील अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील मृत्यू झालेल्याचे नातेवाईक देखील  बोराडी येथील असल्यामुळे त्यांनीही आक्रोश केला.

भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, यात शिक्षकाचा मृत्यू | आठवड्यातील दुसरी दुर्देवी घटना | Road Accident Shirpur |
भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, यात शिक्षकाचा मृत्यू | आठवड्यातील दुसरी दुर्देवी घटना | Road Accident Shirpur |

      शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.अमृत दयाराम पाटील हे शिरपूर कळमसरे येथील आयटीआय हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.