आदिवासी विकास विभागांतर्गत सायकल 100% अनुदानावर वाटप सुरू | Adivasi Vikas Vibhag Yojana | Cycle Vatap Yojana Maharashtra
Adivasi Vikas Vibhag Yojana : आदिवासी विकास विभागाअंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत यासाठी इच्छुक लाभार्थ्याने 16 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपल्या अर्ज विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.
प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे. या चार जिल्ह्यांमध्ये खाली दिलेल्या कल्याणात्मक व वैयक्तिक विविध योजना राबवल्या जात आहेत, तुम्ही या योजनेत पात्र असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावरून अर्ज घेऊन सविस्तर कागदपत्रासह सादर करावेत.
सायकल वाटप योजना |
सायकल वाटप योजना cycle vatap yojana:
योजनेचे नाव Cycle Vatap Yojana Maharashtra
विभाग -नियोजन विभाग
राज्य : महाराष्ट्र राज्य
लाभार्थी :ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी
लाभ: ५०००/- रुपये आर्थिक सहायता
अर्ज करण्याची पद्धत
Cycle Vatap Yojana Documents : सायकल वाटप योजना आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
रहिवासी दाखला
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
रेशनकार्ड
जातीच्या दाखला
बँक खाते
शाळेच्या दाखला
Cycle vatap yojana लाभार्थी:
अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
विद्यार्थिनी इयत्ता वर्गात शिकत असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मुलीच्या शाळेचे घरापासून अंतर ५ किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
आदिवासी विकास विभाग अंतर्गत खालील योजना राबवल्या जात आहेत
- शिलाई मशीन योजना
- सायकल वाटप योजना
- लाभार्थ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून देण्याकरिता अर्थसहाय्य करणे
- शेतकरी लाभार्थ्यांना गोबर गॅस युनिटचे बांधकाम करून देणे
- अपंग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव साहित्य घेण्याकरिता बसविण्याकरिता अर्थसहाय्य देणे
- मुलींना शाळेमध्ये यजा करण्याकरिता सायकल खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य करणे
- मंडळांना बॅन्जो साहित्यिक घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे
- नोंदणीकृत मंडळांना भारुड लोककला व्यवसाय करण्याकरिता व साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्यक करणे.
- नोंदणीकृत दिंडी संस्थांना विविध साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय खेळाडू यांना विशेष प्राविण्य करिता व क्रीडा साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे
- महिला बचत गटांना व्यवसायाकरिता अर्थसहाय्य करणे
- पुरुष बचत गटांसाठी मंडळ मंडप डेकोरेशन साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे
अर्ज कसा करावा (Adivasi Vikas Vibhag Yojana)
वरील प्रत्येक योजनेचे अर्ज विनामूल्य प्रकल्प कार्यालय घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे उपलब्ध आहेत.
अर्जामध्ये योजने करिता आवश्यक कागदपत्र नमूद करण्यात आलेले आहेत ते कागदपत्र आणि अर्ज व्यवस्थित भरून सदर कार्यालयात जमा करावा.
निवड कशी केली जाईल
वरील प्रमाणे वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना करीत अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीचा पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना/बचत गटांना मंडळना योजनेचे लाभ देण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
वरील योजना साठी इच्छुक बचत गटांनी मंडळांनी किंवा वैयक्तिकरित्या परिपूर्ण अर्ज 16 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पोस्टद्वारे अथवा स्वतः कार्यालय सादर करावेत.
सूचना (Tribal Department Schemes 2023)
वरील योजनेचे अंमलबजावणी करण्याचे किंवा त्यामध्ये काय बदल करण्याचे किंवा योजना रद्द करण्याचे सर्वाधिकार हे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी राखून ठेवले आहेत.
तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी आपापल्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग कार्यालयात संपर्क साधावा व अधिक चौकशी करावी, बातमी आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका.