Ration Card new update | 27 हजार 806 लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बंद होणार, या लाभार्थ्यांना शेवटची संधी
Adivasi TV India - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिका (Ration Card) धारक लाभार्थ्यांना आधार लिंक बंधनकारक झाली आहे. पण जिल्ह्यात अजूनही सत्तावीस हजार आठशे सहा लाभार्थ्यांनी आधार लिंक केलेले नाही. वारंवार सूचना देऊनही आधार लिंक केले नाही. त्याचा थेट परिणाम हा रेशनच्या धान्याला मुकावे लागणार आहे.
शासनाकडून अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल शेतकरी लाभार्थी योजना, अंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेतील गैरप्रकार कमी करून पारदर्शक व्यवहारासाठी शासनाने शिधापत्रिका (Ration Card) सोबत आधार लिंक (Adhar Link) न करणाऱ्यांना यापुढे रेशनच्या धान्याला मुकावे लागणार आहे. 100% आधार सिडिंग करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून पुरवठा विभागावर विभागाला देण्यात आलेले आहेत. या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली असून संबंधित रेशन दुकानदार तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधून आधार लिंक करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडे केले आहे.
आधार लिंक नसल्यामुळे सत्तावीस हजार कुटुंबांचे रेशन बंद
शिधापत्रिके (Ration Card) ला आधार लिंक करणे अनिवार्य आहे मात्र अजूनही अनेक लाभार्थ्यांनी आधार लिंक केलेली नाही सध्या तरी एकाही लाभार्थ्यांचे रेशनचे धान्य बंद केलेले नाही मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यातील तब्बल 27806 लाभार्थ्यांचे रेशनचे धान्य बंद होऊ शकते.
ऑक्टोबरचे रेशन नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यातील रेशनच्या धान्याचे वाटप ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली आहे. आधार लिंक नसलेल्या लाभार्थ्यांचे रेशन तूर्तास तरी बंद करण्यात आले नाही. मात्र यानंतर त्यांनी आधार लिंक केले नाही तर रेशनचे धान्य बंद होऊ शकते.
शंभर टक्के आधार लिंक करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. रेशन कार्ड ला आधार लिंक न केलेल्या लाभार्थ्यांना तातडीने आधार लिंक करून रेशन धान्याचा लाभ सुरू ठेवावा. आधार लिंक संदर्भात धन्य दुकानदारांकडून सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार आधार लिंक केले या सूचनेतील गैरप्रकार कमी करून पारदर्शकता येईल.