Hot Widget

Type Here to Get Search Results !

बोराडीत डिजिटल वाॅटर लेव्हल रेकॉर्डर | Digital level water recorder

बोराडीत डिजिटल वाॅटर लेव्हल रेकॉर्डर | Digital level water recorder


धुळे: धुळे येथील शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील हनुमान मंदिराजवळील विहिरीजवळ महाराष्ट्र शासनामार्फत डिजीटल वाॅटर लेव्हल रेकॉर्डर बसविण्यात आले आहे.यामुळे भुजल पातळी किती आहे ते मोजता येते. पाऊस कमी पडल्यास दुष्काळाची पातळी किती राहिल याचा अंदाज करता येईल. व यानुसार परिसरात कोणते पिक घ्यावे याचा निर्णय पाणी पातळीच्या अहवालातुन करता येईल. 


पाणलोटक्षेत्रात पाणी पातळी किती कमी- जास्त झाले याचा अंदाज करता येईल. तसेच पाच वर्षाच्या पाणी पातळी सरासरीवरुन भूजल पातळीची स्थिती समजणार आहे. अशा प्रकारचे रेकॉर्डर धुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बसविण्यात आले असून, शिरपूर तालुक्यात बोराडीत बसविण्यात आले असल्याची माहिती. धुळे जिल्हा परिषदेच्या सहाय्यक जिऑलाॅजिस्ट सुवर्णा गांगुर्डे यांनी दिली. हे यंत्र डिजिटल असल्यामुळे त्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.