राज्यात मान्सून २६, २७ मे पासून सक्रिय होणार; पंजाबराव डख हवामान अभ्यासक महाराष्ट्र
Adivasi TV India: मान्सून २६, २७ मे पासून सक्रिय होणार आहे. त्यानंतर ३१ मे आणि १, २, ३ जून या दिवशी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे.
राज्यात ८ जून ला मान्सून दाखल होणार आहे. ८, ९, १० जूनला राज्यात मॉन्सूनचा पाऊस पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी त्यानुसार तयारी ठेवावी. यंदा पेरणीसाठी खूप पोषक वातावरण असणार आहे.
शेतकऱ्यांनी येत्या १०-१२ दिवसात शेतीतील सर्व कामे करून घ्यावीत व जमीन पेरणी साठी तयार ठेवावी, कारण ८ जूनला मान्सून राज्यात येणार आहे. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष्यात घ्यावा.