Emergency alert severe असा मेसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हे टेस्ट अलर्ट होते सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार कडून भविष्यात काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवृष्ट / भूकंप / वैद्यकीय अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत.
भविष्यात अती प्रसंगी काळी नागरिकांना सुचना म्हणून emergency alert severe चा उपयोग भारत संचार विभागाकडून उपयोग करण्यात येईल. तरी नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही.
देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास emergency alert severe message एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.
सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्ती विषयी एसएमएस पाठवून सूचना दिली जाते. मात्र लोक ते वाचत नाहीत; गांभीर्याने घेत नाहीत; असे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना असे इमर्जन्सीअलर्ट पाठवण्याची ही चाचणी होती, असे सांगितले जात आहे.