नवागांव गावातील लाभार्थींना रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले.
(प्रतिनिधी जितेंद्र पावरा)
Adivasi TV India शिरपुर : तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव पाड्यावरील वंचित रेशन धारकांना रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले...
नवागांव गावातील अनेक कुटुंब मागिल काही वर्षापासून रेशन कार्ड पासुन वंचित होते. या गावातील 52 लोकांनी रेशनकार्ड साठी सन 2021 रोजी तहसीलदार कार्यालय शिरपुर येथे नवीन रेशन कार्ड मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता या संदर्भात वारंवार बन्सीलाल पावरा यांनी शासनाला पाठपुरावा केल्याने त्याची दखल घेऊन त्यातील काहींनी जुलै 2022 मध्ये 22 लाभार्थींना केसरी कार्ड चे वाटप करण्यात आले होते. उर्वरित 25 लाभार्थींना ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार पिवळे रेशनकार्ड (PHH) वाटप करण्यात आले...
अनेक वर्षांपासून रेशन कार्ड वंचित असलेल्या आदिवासी बांधव या वेळी आनंदाने भारावून गेले असल्याचे दुश्य दिसत होते, बन्सीलाल पावरा व महसुल प्रशासनाचे जितेंद्र पावरा व ग्रामस्थांनी आभार मानले...
या वेळी : बन्सीलाल पावरा, जितेंद्र पावरा, उदेसिंग पावरा, प्रकाश पावरा, भायासिंग पावरा, दिनेश पावरा, अनिल पावरा व लाभार्थीं, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते...