सातपुडा पावरा समाज सेवा संघ,महाराष्ट्र (रजि.) संचलित, धुळे जिल्हा शाखा शिरपूर ची नियतकालिन आढावा बैठक संपन्न
Dhule: मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी दु.4.00 वा, हॉटेल अक्षय रेस्ट्रो. शहादा रोड शिरपूर,जि.धुळे येथे मा.डाॅ.सी.एम.पावरा,अध्यक्ष धुळे जिल्हा शाखा,यांचे अध्यक्षतेखाली मा.इंजि.रविंद्र आर्य,राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष,मा.अॅड.बाजीराव पावरा आणि मा.मुख्या.लालचंद पाटोळे, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत मा.श्री.के.के.पावरा धुळे* यांनी समाज एकत्रिकरणासाठी संघाने पुढाकार घ्यावा आणि विविध उपक्रमाव्दारे एकसंघ करण्याचे आवाहन केले.*मा.डॉ.डी.एल.पावरा* सरांनी पावरा समाजावर संशोधन करून समाजाबाबत विविध लिखाणाचे काम संघटनेने करावे,म्हणजे समाजाचा इतिहास लिहीला जाईल आणि पुढील पिढीकरीता उपयुक्त ठरू शकेल.*मा.मुख्या.श्री.लालचंद पाटोले* सरांनी सर्कशीतील कुत्र्याचे उदाहरण देऊन जो कोणी समाजात जागृत होत आहे त्यांना उचलून बाजूला केले जाते याबाबतची विस्त्रृत माहिती विषद केली.*मा.अॅड. बाजीराव पावरा* यांनी जात प्रमाणपत्र बाबत येणारे अडचणी सोडवून जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देणे बाबत संघाने सहकार्य करण्याचे विचार मांडले.
*मा.पो.पा.किसन पावरा* यांनी पावरा समाजातील युवकांनी नोकरीसाठी प्रयत्न जरुर करावा पण सोबतच व्यवसाय व उद्योगक्षेत्रातही पदार्पण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. *मा.इंजि.रविंद्र आर्य* यांनी समाजातील सर्व अधिकारी/कर्मचारी बांधवांना एकत्रित करून समाज जागृतीचे कार्य संघाने हाती घेतले आहे,त्यास समाज बांधवांनी हातभार लावावा आणि संघास सहकार्य करावे असे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष *मा.डाॅ.सी.एम.पावरा सर* यांनी संघाने आजपर्यंत विविध कार्यक्रमाव्दारे समाज जागृतीचे कार्य करीत आहे. त्यामुळे समाजात सद्यस्थितीत विविध संघटना निर्माण झाले आहेत.त्यांचे अभिनंदन आहे.परंतु समाजातील नोकर वर्ग यांनी संघाचे सभासद होऊन संघटनेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली.
✳️समाजातील विविध ठिकाणी नोकरीनिमित्त विखुरलेल्या समाजबांधवांचा शोध घ्यावा आणि त्यांना एकसंघ होणेकरीता प्रयत्न करावा.
✳️ समाजातील आजच्या पिढीला समाजाचा इतिहास माहित व्हावा या उददेशाने समाजातील तज्ञ व्यक्तींनी पुढाकार घेऊन मागील इतिहासाचा अभ्यास करून लिखित करून संघटनेमार्फत समाजासमोर मांडावा,यावर विचार करणेत आला.
✳️ समाजातील समाज बांधवांना उद्योजक होणेसाठी कल निर्माण करून विविध कार्यक्रमाद्वारे प्रवृत्त करणे.
✳️सांगवी ता.शिरपूर जि.धुळे येथिल घटनेबाबत चर्चा करण्यात आली.व आदिवासी बांधवांवरिल गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी शासनाच्या वरिष्ठ स्तरावर विनंती करण्याचे ठरले.
✳️बैठकीबाबत पावरा समाजाच्या Whats app गृपवर आवाहन करण्यात आले,मात्र बैठकीला अधिकारी वर्ग व कर्मचारी बांधवांची उपस्थिती पाहिजे तशी नसल्याने बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली!
✳️दरवर्षी विविध विषयावर कार्यक्रम राबवून समाज जागृतीसाठी प्रयत्न करणे आदी विषयावर चर्चा करून बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.प्राध्यापक जयसिंग पावरा यांनी केले तर आभारप्रदर्शन शाखा उपाध्यक्ष, श्री.कैलास मेहता सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.आनंदसींग पावरा,श्री.दिपक पावरा यांनी मेहनत घेतली!