सातपुडा पावरा समाज सेवा संघ, महाराष्ट्र ( रजि. ) संचलित, जळगांव जिल्हा शाखा चोपडा आयोजित
कार्यकारणी बैठक आणि कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा"
Jalgaon: रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी दु. १२.०० वा संजीवनी नगर सामाजिक सभागृह चोपडा, जि.. जळगांव येथे मा. चंपालाल एन. बारेला, अध्यक्ष जळगांव जिल्हा शाखा यांचे अध्यक्षतेखाली मा. इंजि. रविंद्र आर्य, राष्ट्रीय संस्थापक- अध्यक्ष, डॉ. सी. एम. पावरा, मा. कैलास मेहता, डॉ. सोनाली बारेला आणि मा. रामदास भाईदास पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
बैठकीत *मा.चंपालाल एन. बारेला* यांनी संघटनेच्या स्थापनेपासून राज्यातील व जिल्ह्यातील आतापर्यंत केलेली सर्व कामांची माहिती दिली. *डॉ. सी. एम. पावरा* यांनी गावामध्ये ठिकठिकाणी बैठका घेऊन शैक्षणिक जनजागृती करण्याचे आवाहन केले. *मा. कैलास मेहता* यांनी युवक वर्गानी आपल्या परिस्थिती व समस्यांवर मात कशी करावी याबद्दल आवाहन केले. *डॉ. सोनाली बारेला* यांनी महिलांच्या आरोग्या विषयी माहिती दिली. *श्री. रामदास भाईदास पावरा* यांनी सर्व युवा पिढीने आपल्या कौशल्यानुसार व्यावसायिक उद्योगाकडे वळण्याचे आवाहन केले.
तसेच मारवाडी समाजाकडून प्रेरणा घेऊन आपला समाज उंचावण्यासाठी समाजाबद्दल एकनिष्ठ राहून सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करावे असे आपल्या भाषणात नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष **मा.इंजि.रवींद्रआर्य साहेब* यांनी आपल्या मनोगतात समाज ऐकवटण्यासाठी नवीन पिढीने सक्रिय राहून प्रयत्न करावे, असे आवाहन केले. नविन प्रचार समिती स्थापन करून नविन सभासदांना संघटनेची उद्दिष्टे व कार्य कसे करावे बद्दल मार्गदर्शन केले. नविन सर्व सभासदांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*बैठकीत खालील विषयावरती चर्चा झाली.*
*१)दर्जेदार शिक्षण उपलब्ध करण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील यावर चर्चा झाली.*
*२) बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करणे.*
*३) शेती पूरक व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.*
४) गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना योग्य त्या दिशेस नेण्यास प्रयत्न करणे.
५) आपली संस्कृती, परंपरा यांचे संगोपन करून ती कशी जोपासता येईल यावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेकराम बारेला यांनी केले तर,आभार ज्योती भादले यांनी मानले .