Dhule: उद्योजक शरविल पटेल झायडस औषध कंपनीचे विद्यमान चेअरमन यांच्या आज शिरपूर दौरा; तालुक्यासाठी सुवर्ण संधी
Dhule: दि. २६, शिरपूर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारे नेते, कार्यकर्ते व सर्वच क्षेत्रात काम करणारे युवा मित्रांना आग्रहाचे आव्हान करण्यात येते की, आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते मा.शालेय शिक्षण मंत्री, आ. श्री अमरिषभाई पटेल, युवकांचे प्रेरणास्थान मा. नगराध्यक्ष, श्री भुपेशभाई पटेल, यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्याने केलेल्या विविध क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीने उभा महाराष्ट्र भारावला आहे , पटेल परिवाराने या तालुक्यालाच घर नव्हे तर मंदिर मानले आहे.
तालुक्याच्या विकासासाठी नुसते सरकारी योजनांच्या अनुदानावर अवलंबून न राहता आपल्या परिवारातील सदस्यांच्या नावे असलेल्या ट्रस्ट च्या माध्यमातून मग त्यात आर सी पटेल शैक्षणिक संस्था असो, मुकेशभाई पटेल क्रीडा व युवक सेवा संस्था, मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, भुपेशभाई ग्रीन आर्मी,तपनभाई पटेल युवा मंच, चिंतनभाई पटेल,युवा मंच, आर सी पटेल मेडिकल फाउंडेशन, असो किंवा अश्या इतर अजून ट्रस्ट असोत या विविध माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत.
दि.26/09/2023 रोजी त्या लोकसेवा यज्ञात आपला सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पटेल परिवाराची कन्या, स्व. खा. मुकेशभाई पटेल यांची सुकन्या व युवकांचे हरपलेले नेतृत्व कै. तपनभाई पटेल यांच्या भगिनी सौ. मेहा शरविल पटेल, शिरपूर येथे येत आहेत
श्री शरविल पटेल, पटेल कुटुंबाचे जावई असून झायडस ग्रुप, अहमदाबाद या औषध कंपनीचे नॉन एक्सिक्यूटिव्ह डायरेक्टर आणि विद्यमान चेअरमन आहेत, देशभरातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे स्थान आहे दानशुरपणाचा वारसा त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतला आहे, आपल्या सासरकडील पटेल परिवार करीत असलेल्या जनसेवेने प्रभावित होऊन त्यांनी त्यांच्या कंपनीला होणाऱ्या नफ्यातून दरवर्षी शिरपूर तालुक्यातील जनतेला काही टक्के हिस्सा देण्याची घोषणा, मा.मंत्री आ.श्री अमरिषभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिवशी करणार आहेत. त्यात शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यासाठीच्या योजनांचा समावेश असणार आहे
तरी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
सदरहू कार्यक्रमासाठी काही महत्वाच्या सूचना -
1) कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच सुरू होईल.
2) प्रमुख पाहुण्यांच्या व्यस्ततेमुळे कार्यक्रम फक्त 40 मिनिटच चालेल.
3) कृपया आपण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नियोजित ठिकाणी. 20 मिनिट अगोदर येऊन बसावे.
4) कार्यक्रम सुरू झाल्यावर पाहिल्या मुख्य. द्वारातून प्रवेश बंद असेल.
5) कार्यक्रमा दरम्यान सर्वांनी कृपया आपापले मोबाईल बंद ठेवावेत.
6) मंचावर फक्त परिवारातील सदस्य उपस्थित राहतील.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे:
कार्यक्रम दि. 26/09/2023 मंगळवारी सकाळी ठीक 11:00 वाजता, आर सी पटेल, मेन बिल्डिंग येथील श्री राजगोपाल चंदूलाल भंडारी हॉल येथे ठेवण्यात आलेला आहे.