शिरपूर समुदाय आरोग्य अधिकारी संघटना ह्यांची अनेक प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी मंत्री साहेबांची यशस्वी भेट.!
Dhule : दिनांक २४सप्टेंबर रोजी मा. गुलाबरावजी पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री जळगाव हे शिरपूर शहरात आले असता समुदाय आरोग्य अधिकारी महाराष्ट्र राज्य, धुळे जिल्हा ह्यांचे अनेक प्रलंबित विषय व शिरपूर तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांचा प्रलंबित HARD AREA ALLOUNCE विषय लवकरच मार्गी लावावा ह्यासाठी माननीय मंत्री साहेबांना निवेदन दिले व विनंती केली. मंत्री साहेबांनी तात्काळ दखल घेण्याचे आश्वासित केले आहे.
ह्यावेळी डॉ.विनोद पाटील, डॉ.हिरा पावरा, डॉ.विश्वास पाटील, डॉ.प्रवीण कोळी आदी उपस्थित होते.