Hot Widget

Type Here to Get Search Results !

ट्रायबल टालेंट सर्च फाउंडेशन [TTSF] शाखा- शिरपूर आयोजित आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला

ट्रायबल टालेंट सर्च फाउंडेशन [TTSF] शाखा- शिरपूर आयोजित आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला

ट्रायबल टालेंट सर्च फाउंडेशन [TTSF] शाखा- शिरपूर आयोजित आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला


शिरपूर शहरात ट्रायबल टालेंट सर्च फाउंडेशन [TTSF] शाखा- शिरपूर आयोजित आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला.!


Dhule: 15 Oct 2023  शिरपूर येथील पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात मा.श्री.सुनिल वसावे  (PSI)- सांगवी - विद्यार्थी जिवनात अनेक अडचणी येतात, परंतु अशा अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजे असे सांगितले.


   मा.श्री. मनजीतसिंग चव्हाण साहेबांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे.


 मा.श्री. संजय पावरा - राज्य कर निरीक्षक मुंबई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की यशस्वी होण्यासाठी वेळेचं नियोजन करून कठोर परिश्रम करा. यश हे तुमच्या पायाशी असेल. प्रामाणिकपणे अभ्यास करा , आई- वडील मेहनत करून आपल्या शिक्षणावर पैसे खर्च करीत असतात, त्याचा सदुपयोग करा.


 मा.श्री.डॉ.सी.एम.पावरा spdm college Shirpur यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षणाच्या विविध प्रकारच्या शाखा असतात, त्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात केले पाहिजे.  


 मा.श्री. के.के.पावरा सर प्याराबाई सोमाणी विद्यालय धुळे - यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, विविध विषयांवरील मूळ संकल्पना समजून घेतल्या तर अभ्यासात अडचणी येत नाहीत.


अध्यक्षीय भाषणात श्रीमती मंगला मॅडम यांनी सांगितले की समाज सक्षमीकरणासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन  उंच भरारी घेतली पाहिजे.


  मा.श्री. एस. आर. गवळी मुख्याध्यापक पां.बा.माळी म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शैक्षणिक उपक्रमात आपला नेहमीच मदतीचा हात राहील.आपण केव्हाही हाक द्या .


  श्री. बादल पटले सरांनी प्रास्ताविक मांडले, श्री.दिनेश एल.पावरा सरांनी   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. दिनेश एस. पावरा सरांनी  आभार प्रदर्शन केले....


    या कार्यक्रमात आदिवासी कवी मा.श्री. विठ्ठल भंडारी यांचा सत्कार करून त्यांच्या "तीर कलम" या पुस्तकाची ओळख करून दिली.....


मा.श्री. डॉ. डी. एल. पावरा (spdm college Shirpur)  यांचाही बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव - मानव विद्या शाखेतील इतिहास विषयात संशोधन करून पी.एच.डी.मिळवून मार्गदर्शकाची मान्यता मिळविणारे पहिले आदिवासी. म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला....


मा.श्री.सी. एस. खर्डे शिक्षणविस्तार अधिकारी हे कार्यक्रमला उपस्थित राहून  TTSF ला 2100₹ रोख देणगी दिली...मा.श्री. डॉ.सी.एम.पावरा spdm college Shirpur यांनीही TTSF ला 5000₹ रोख देणगी दिली...

  मेहनत घेणाऱ्या TTSF च्या सर्व टिमचं आणि TTSF ला मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सर्वांच्या वतीने आभार मानले.!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.