Hot Widget

Type Here to Get Search Results !

Dhule: साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; पोलिसांच्या प्रयत्नांना यश मुलगी सेंधवा मध्य प्रदेश येथे सुरक्षित सापडली

Dhule: साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; पोलिसांच्या प्रयत्नांना यश मुलगी सेंधवा मध्य प्रदेश येथे सुरक्षित सापडली

Dhule: साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; पोलिसांच्या प्रयत्नांना यश मुलगी सेंधवा मध्य प्रदेश येथे सुरक्षित सापडली 


Dhule: साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; मुलगी सुखरूप पोलिसाचया ताब्यात, सहा संशयीत ताब्यात


प्राथमिक माहितीनुसार सदर तरुणीला सेंधवा येथून सुरक्षित हस्तगत करत शिरपूर शहर पोलिस निरीक्षक जयेश खलाने व त्यांच्या पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली येथील पोलीस ठाण्यात आणले आहे.


Dhule: साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; सहा संशयीत ताब्यात

धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटून लांबवत तरुणीचे अपहरण केले होते.


Dhule:  साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत  23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; सहा संशयीत ताब्यात

Dhule Sakri Police Station


धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री (Dhule Sakri)  येथे पाच ते सात दरोडेखोरांनी (Robbers)  चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय तरुणीचे अपहरण केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहत्या घरातून तरूणीचे अपहरण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साक्री पोलीस ठाण्यात (Sakri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. 


धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटून लांबवत तरुणीचे अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.  या घटनेतील दरोडेखोरांनी तोंडाला मास्क बांधून ते हिंदीतून बोलत असल्याचे महिलेने सांगितले होते.


काही तासातच सहा संशयीत ताब्यात


साक्री शहरातील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत वास्तव्यस असलेल्या ज्योत्स्ना पाटील (40 वर्षे) आणि त्यांची भाची निशा शेवाळे या दोघी घरात टीव्ही पाहत असताना घराचा दरवाजा ठोठावण्याचा त्यांना आवाज आला. घराचा दरवाजा उघडला असता घरात सहा अज्ञातांनी प्रवेश करत या दोघींना धारदार शस्त्राचा धाक दाखवला.  त्यांच्या कपाटातील तिजोरीतून सुमारे 88 हजार पाचशे रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले.  तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधून निशा शेवाळे अपहरण करून तिला सोबत घेऊन गेले.  याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.  तसेच मुलीला मध्य प्रदेशातील सेंधवा येथून सुरक्षित पकडले आहे.


घरी एकटी असल्याने भाचीला बोलावले


ज्योत्सना पाटील यांचे पती काही कामानिमित्त पाटील हे संगमनेर येथे गेले होते.  ज्योत्सना घरी एकट्या असल्याने त्यांनी भाची निशा शेवाळे हिला झोपण्यासाठी घरी बोलावून घेतले. निशा एका मेडिकल शॉपमध्ये काम करते. निशा व ज्योत्सना रात्री जेवण करून गप्पा करत बसल्या असता रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावले होते. तसेच त्यांच्या हातात बंदूक आणि चाकू होता. दरोडेखोरांनी कपाटातील दागिने तर पळवले पण अंगावरील दागिने देखील हिसकावून घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.