मंत्री ,आमदार, खासदारांनो जरा लाज वाटू द्या; लोकांनी बुजवले श्रमदानातून रस्त्यावरचे खड्डे!
धडगाव: माजी आदिवासी विकास मंत्री के. सी.पाडवी यांच्या असली गावाकडे जाणारा रस्ता खूपच धोकादायक बनला आहे.खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे.अस्तंबा येथे देव अहाट्या यात्रेकडे लाखो भाविक या रस्त्यावरून जात आहेत.या रस्त्यावर अनेक प्रवाशांचे अपघात होऊन मृत्यू झाला आहे.तरी नंदूरबार जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष आहे.धडगावचे विद्यमान आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी,१० वर्षापासून खासदार असणा-या नंदूरबारच्या हिना गावित, विद्यमान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे बघत दुर्लक्ष करीत असल्यामुळे "मंत्री ,आमदार, खासदारानों लाज वाटू द्या" असा संताप जनतेत निर्माण झाला आहे.या निष्क्रीय नेत्यांना मतदान न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेने या रस्त्यासाठी कालिबेल, सिसा,चूलवड, जरली,राडीकलम, पालखा,धडगाव अशा ठिकाणी खड्ड्यासमोर घंटानाद आंदोलन केले होते.प्रशासनाने लेखी माहिती व आश्वासन देऊन काही ठिकाणी तात्पुरते खड्डे बुजवण्याचा दिखावा करून हा रस्ता दुरूस्त केलाच नाही.या श्रमदानात कालिबेलचे विरसिंग वळवी,मंगल वळवी,कनवर वळवी,कुंभा-या वळवी,युवराज वळवी,युवराज पाडवी (सिसा),रतिलाल वळवी,जाहगीर वळवी,अविनाश वळवी,धिरसिंग वळवी,भगतसिंग वळवी,अरूण वळवी आदि ग्रामस्थांनी श्रमदानातून मोठ मोठाले खड्डे बुजवले.त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.