वसुबारस (वाघबारस) म्हणजे काय?
Adivasi TV India : आदिवासी या शब्दाचा अर्थ 'आदि' म्हणजे सर्वात पहिले, 'वासी' म्हणजे निवास करणारे,राहणारे असा होतो. याचाच अर्थ असा की, प्राचीन काळापासून या पृथ्वीवर राहणार व प्रथम जन्माला आलेला माणूस आदिवासी होय. काळानुसार मानवाचा विकास होत गेला, शिकार, हत्यारे, अग्नी, शेती, अन्न, औषधी वनस्पती यांचा शोध लागला. व तो स्थिर झाला. अन्न म्हणून जंगलातील, फळे, कंदमुळे, प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरूं लागले. नंतरच्या काळात हळूहळू बदल होत जाऊन शेती करू लागला,वस्ती करून राहू लागला.
पाळीव प्राणी म्हणून गाय, बैल, शेळ्या, कोंबड्या, म्हैस इ. चे संगोपन करू लागला, तेंव्हा मात्र जंगले खूप होती जंगलात वाघांची संख्या खूप होती. वाघ आदिवासीच्या पाळीव प्राण्यांची शिकार करून खाऊ लागले.तेंव्हापासून आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये वाघाला देव, मानू लागले. पाळीव प्राण्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी वाघबारस हा सण साजरा करायला सुरुवात केली आणि ती आजपर्यंत आहे. हा खूप महत्त्वाचा आदिवासी सण आहे. वाघोबाला नवस म्हणून कोंबडा, खीर, याचा निवद दाखवला जातो. त्यामुळे वाघ आपल्या पाळीव प्राण्यांना त्रास करत नाही असे मानतो.
या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते. आदिवासी समाज निसर्गाला देव मानतो.