Hot Widget

Type Here to Get Search Results !

बोराडीच्या सुनिल पावराला यु्टूयबने दिलं सिल्व्हर प्ले बटन; कमाई किती?

बोराडीच्या सुनिल पावराला यु्टूयबने दिलं सिल्व्हर प्ले बटन

बोराडीच्या सुनिल पावराला यु्टूयबने दिलं सिल्व्हर प्ले बटन


‘सुनिल चौहान ऑफिसीअल’ या नावाने युटुब चैनल. सध्या युटुबवर ३४८ विडियो ॲपलोड व १ लाख १७ हजार सबस्क्राईबर आहेत. युटुबवर सुनिल पावरा गुगल ऐडसेनने पैसे हि कमावतो.


Adivasi TV India: स्मार्टफोनच्या उदयानंतर अनेक हौशींनी आपलं युट्यूब चॅनेल काढून आपल्यातली कला जगासमोर नेण्याचा प्रयत्न केला. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण युट्यूबवर आपल्या कलेचे सादरीकरण करत असतात. धुळे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील बोराडी येथील सुनिल विकला पावरा ३२ वर्षीय त्यातील एक. सुनिलने देखील युट्यूबवर आपलं चॅनेल काढून संगीत कला जगाला दाखविण्याचा प्रयत्न केला. सुनिलचा या प्रयत्नाला युट्यूबवर लाखो लोकांनी पसंती दिलेली आहे. तर युट्यूबने देखील सुनिलची दखल घेत त्यांच्या चॅनेलला सिल्व्हर प्ले बटन देऊ केले आहे.


सुनिलने युटुबवर गाणी बनवण्याची सुरुवात २०१८ पासुन सुरु केलेली आहे. सुनिल पावरा यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले असुन ते सध्या आर .सी .पटेल एज्युकेशन सोसायटी शिरपूर येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सुनिलचा मेराली याहा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. त्यात खानदेशी / अहिराणी / मराठी / गुजराथी / आदिवासी / टीमली , रोडाली , सर्व प्रकाराचे गाणे रेकॉर्डिंग करतात. आज सर्व व्हिडिओंना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.” यूट्युबवरील सबस्क्रायबर्सची संख्या १ लाखापर्यंत  पोहोचल्यावर यूट्युबकडून क्रिएटरला सिल्वर प्ले बटन प्राप्त होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.