Hot Widget

Type Here to Get Search Results !

दहिवद: टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा | TSB IPER College of Pharmacy Dahiwad Shirpur

टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा | TSB IPER College of Pharmaceutical Dahiwad Shirpur

टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा | TSB IPER College of Pharmaceutical Dahiwad Shirpur


प्रतिनिधी, दि. 9 ऑगस्ट 2024


धुळे: शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील हॉनेरेबल टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन व रिसर्च महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. पृथ्वीवरील एकूण मानवी लोकसंख्येपैकी सुमारे दशलक्ष लोकसंख्या असलेल्या जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो.  हा कार्यक्रम उपलब्धी आणि योगदान ओळखतो आणि जगातील स्थानिक लोकांच्या हक्कांचे संरक्षण करतो.


शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील हॉनेरेबल टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन व रिसर्च महाविद्यालयात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.  या वर्षाची थीम होती "पारंपारिक ज्ञानाचे जतन आणि प्रसारणात स्थानिक महिलांची भूमिका". निसर्ग हाच आपला देव आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो. आमचे निसर्गावर खूप प्रेम आहे. निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे मनोगत संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धिरज बाविस्कर यांनी या वेळी व्यक्त केले. शाळेचे प्राचार्य डॉ. तुषार साळुंके यांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धिरज बाविस्कर संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य डॉ. तुषार साळुंके, प्रा. स्वप्नील पाटील, नम्रता माळी, नितीन पाटील, सुभरसिंघ राठोड, विशाल माळी, अतुल चौधरी, वैशाली पाटील, अर्चना वाडीले, धर्मजित पावरा, महिमा पाटील, सुनैना धनगर, रितिका माळी, हेमंत बोरसे, जगन पावरा, कपिल साळुंखे, ईश्वर पावरा, गुड्डू पावरा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी लिलाबाई कोळी, मारथा पाडवी हे या प्रसंगी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमासाठी शिक्षीका वैशाली पाटील व नितीन पाटील यांचे सहकार्य लाभले. तर आभार धर्मजित पावरा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.