दहिवद येथील टि.एस.बी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला
प्रतिनिधी दि. 6 ऑगस्ट 2024
शिरपूर (जि. धुळे) दहिवद येथील टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च महाविद्यालयात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा मानस ठेवून महाविद्यालयाने हा उपक्रम राबविला. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना महाविद्यालयाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
शिक्षक समाजाला वळण लावण्याचे काम करतात. ते आपले मार्गदर्शक असतात. शिक्षकांचे स्थान आई- वडिलांप्रमाणे असते. आई-वडील मुलांना उत्तम संस्कार देतात तर शिक्षक मुलाचे आयुष्य घडवतात असे मनोगत संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात मांडले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य डॉ. तुषार साळुंके, प्रा. स्वप्नील पाटील तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.