दहिवद फार्मसी महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची सुरूवात
शिरपूर, दि. २०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी दहिवद येथील टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांकरता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते होणार-या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टेअप योजना उद्घाटनाच्या सोहळा दाखवण्यात आला व योजनेची माहिती देण्यात आली. महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांमध्ये २०० ते ६०० तासांचे (साधारण: ३ महिने) नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेर्मवर्क सुसंगत असलेले अल्प मुदतीचे अभ्यासक्रम विनाशुल्क राबविण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेवून उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार आहेत, असे संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात मांडले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला जगात अग्रेसर बनविण्यासाठी कौशल्य विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातही आगामी पाच वर्षात ४.१ कोटीहून अधिक युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी देशात निर्माण करण्यासाठी दोन लाख कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या भारताच्या रोजगार २०२४ अहवालानुसार, भारत हा २०२६ पर्यंत सर्वाधिक तरुणांचा देश असेल. ग्रामीण व शहरी विकासातील दरी दूर करून प्रत्येकाला प्रशिक्षण देण्यासाठी शासन तत्पर असून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे असे देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी आपल्या संभाषणात म्हंटले.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, लोकसभा व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य ई- उपस्थित होते तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे सरला पाटील मा.जि. परिषद अध्यक्षा, आशा पवार पंचायत समिती सदस्या, चयणसिंह गिरासे ग्रामसेवक, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका सौ. मानसी बाविस्कर, डि. फार्मसीचे प्राचार्य डॉ. तुषार साळुंके, प्रा. स्वप्नील पाटील, एस.आर.बी. स्कूलच्या मानव संसाधन अधिकारी प्रविण देशमुख, शाळेचे प्राचार्य सुभाष पटले, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनैना धनगर व आभार प्रा. वैशाली पाटील यांनी मानले.