Hot Widget

Type Here to Get Search Results !

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करा

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करा- हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र यांचाकडे केली मागणी 

राज्य संघ वार्ता: दिनांक १४/०९/२०२१रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या मागणीपत्रानुसार मा. ना श्री  हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे दालनात मे अप्परमुख्य  सचिव ग्रामविकास अवरसचिव  व कक्ष अधिकारी ग्रामविकास विभाग यांचे उपस्थितीत बैठक पार पडली

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे प्रथम मागणी नुसार  -

  • 1)ग्रामसेवक संवर्गाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी वेतन त्रुटींची मागणी मार्गी लावणे करिता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करून ग्रामसेवक निवडीची शैक्षणिक पात्रता पदवी करून ग्रामसेवक  एकच पद निर्माण करावे व दुसरी पदोन्नती थेट विस्तार अधिकारी द्यावी ही आग्रही मागणी केली
  • त्या मुळे सेवानिवृत्ती पर्यंत ग्रामसेवक याना क्लास वन चे वेतन मिळू शकते या बाबत लवकर निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जाईल  असे आश्वस्त केले.
  • 2) 20 ग्रामपंचायत मागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करून 505 विस्तार अधिकारी  पदे निर्माण करणेत यावीत या मुळे कोणताही नवीन आर्थिक बोजा निर्माण होणार नाही हे पटवून दिले त्या मुळे पदोन्नतीच्या संधी वाढणार आहेत तसेच एन आर एल एम कडील विस्तार अधिकारी पदे रद्द न करणे बाबत  आग्रही मागणी करणेत आली.
  • 3) ग्रामसेवक संवर्गावरील अतिरिक्त योजनांचा ताण कमी करणे करिता ग्रामस्तरावरील ज्या विभागाशी संबंधित जी समिती असेल त्या विभागाचा कर्मचारी सचिव नेमणे व त्याचे अभिलेखे हाताळणे  बाबत .
  • व इतर विभागाचे काम न सोपवणे बाबत मागणी करणेत आली या बाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करणेत यावी असे सूचित केले.
  • 4) कायम प्रवास भत्ता १५०० रुपायावरून वाढ करून ३००० रुपये करणेत यावा व सदर  बाबत फिरती दौरा मंजुरी करणेची जाचक अट काढून टाकण्यात यावी या बाबतच्या जाचक अटी काढून टाकनेत याव्यात असे सूचित केले.
  • 5) यवतमाळ  जिल्ह्यासाठी बुलढाणा ऐवजी अमरावती येथे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र निर्माण करणेत यावे या बाबत प्रस्थाव मागवणेत यावा व मागणी मार्गी लावणेत यावी असे सूचित केले.
  • 6) जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत मागणी करणेत आली.

या सर्व बाबीवर मा. मंत्री महोदय यांनी नवीन आर्थिक भार विरहित मागण्या बाबत लवकरच निर्णय घेऊ व आर्थिक बोजा पडणाऱ्या मागण्या बाबत कोरोना लाट आटोक्यात आले नंतर अंमलबजावणी बाबत पुन्हा बैठक लावणे बाबत साहेबांनी  शिष्टमंडळास आश्वस्थ केले. या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य अध्यक्ष श्री विजयजी म्हसकर सरचिटणीस श्री के आर किरुळकर राज्य उपाध्यक्ष श्री  सागर सरावणे  सचिव अनिल जगताप नवनाथ गोरे इ. उपस्थित होते.

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करा- हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र यांचाकडे केली मागणी

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करा- हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र यांचाकडे केली मागणी 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.