Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोण आहेत आमशा पाडवी? | Aamsha Dada padvi viral video|

 

कोण आहेत आमशा पाडवी? | Aamsha Dada padvi viral video|
आमदार आमश्या दादा पाडवी विधान परिषद सदस्य 

कोण आहेत आमशा पाडवी? | Aamsha Dada padvi viral video|


Aamsha Dada padvi | नंदुरबार - आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. तर ते धडगाव नंदुरबार विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण 2019च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80 हजार 777 मते घेतली होती.


म्हणून शिवसेनेनं दिली होती उमेदवारी

नंदूरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून नंदूरबारमधून काँग्रेसची राज्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. त्यामुळे या जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडवी यांना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. व आत्ता आमश्या दादा पाडवी विधान परिषदेत धडगाव नंदुरबार जिल्ह्यातील मतदारसंघ शिवसेना कडून सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

आमश्या दादा पाडवी यांच्या Viral Video पाहा 👇



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.