Hot Widget

Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत बोराडी व समता फाउंडेशन यांचा संयुक्त विद्यमाने नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

धुळे: शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील व परिसरातील सर्व बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे की, आपल्या बोराडी गावात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम समता फाउंडेशन कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार व ग्रामपंचायत कार्यालय बोराडी यांच्या संयुक्त विद्यमानाने नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात येत आहे.

नेत्र तपासणी शिबिर दिनांक 25 /5 /2023 वार गुरुवार 

नेत्र तपासणी वेळ सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत.

शिबिराचे वैशिष्ट्ये

१)शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णाची नि:शुल्क तपासणी व योग्य सल्ला मार्गदर्शन केले जाईल.

२) मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णाची नि:शुल्क शस्त्रक्रिया केली जाईल.

३) मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची नि:शुल्क राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.

४) मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची येण्या जाण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येईल.

५) रुग्णाच्या आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स सोबत आणावेत.

६) मोतीबिंदू असलेल्या रुग्णाची भरती तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल.

शिबिराचे ठिकाण :- ग्रामपंचायत कार्यालय बोराडी ता. शिरपूर जि. धुळे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.