Hot Widget

Type Here to Get Search Results !

ईश्वर पावरा व लखन पावरा यांची मुंबई पोलीस दलात निवड

ईश्वर पावरा व लखन पावरा यांची मुंबई पोलीस दलात निवड

ईश्वर पावरा व लखन पावरा यांची मुंबई पोलीस दलात निवड 


शिरपूर: महाराष्ट्र मुंबई पोलीस शिपाई परिक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गुऱ्हाडपाणी येथील ईश्वर पावरा व चांदसुर्या येथील लखन पावरा यांची निवड झाली आहे. 


दोघांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होते परंतु पोलीस व्हायचे स्वप्न होते. आणि त्यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात पुर्ण केले. महाराष्ट्र राज्य मुंबई पोलीस शिपाई पदाची उत्तीर्ण झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

उत्तीर्ण यादीत या आदिवासी विद्यार्थ्यांच्या ही समावेश

ईश्वर पावरा याचे इ. १ ली ते १०वी पर्यंतचे शिक्षण आश्रमशाळा वाघाडी येथे घेतले. तसेच इ. ११-१२ वीचे शिक्षण आर.सी.पटेल ज्यु. कॉलेज शिरपूर कला शाखेतून घेतले व पदवी शिक्षण कॉलेज जळगाव येथून पुर्ण केले. ईश्वर पावरा याला मैदानी चाचणीत एकूण ५० पैकी ३९ व लेखी परिक्षेत १०० पैकी ७१ गुण मिळवले.


लखन पावरा याला मैदानी चाचणीत एकूण ५० पैकी ३६ व लेखी परिक्षेत १०० पैकी ७४ गुण मिळवले. ११-१२ वीचे शिक्षण एसपीडीएम कॉलेज शिरपूर येथून विज्ञान शाखेत घेतले. तसेच बीटेक पदवी शिक्षण संभाजीनगर येथून घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.