Hot Widget

Type Here to Get Search Results !

आदिवासी आश्रमशाळा समस्या बीकेडी ची जळोद आश्रमशाळेला धडक भेट.

आदिवासी आश्रमशाळा- बीकेडी ची जळोद आश्रमशाळेला धडक भेट.

शिरपूर- दिनांक 21 फेब्रुवारी रोजी बिरसा क्रांती दलाच्या वतीने अनुदानित आश्रमशाळा जळोद ता. शिरपूर जि. धुळे येथे भेट दिली असता,... 779 विद्यार्थ्यांपैकी 150 मुलांची उपस्थिती प्रत्यक्ष दिसून आली..... शाळेत भौतिक सुविधांचा पुरता बोजवारा ऊडालेला आहे.... मुलींचे शौचालय मागील कित्येत महिन्यांपासून बंद अवस्थेत पत्र्याच्या शेळमध्ये पडून आहेत. जेथे 5 मिनिटेही थांबू शकणार नाही इतकी दूर्गंधी आहे. हा सगळा प्रकार प्रत्यक्ष फिरून अनुभवला. विशेष म्हणजे या दुर्गंधींयुक्त पडक्या शौचालयाला लागूनच म्हणजे अगदी समोरच स्वयंपाकगृह आहे हे विशेष..

Watching YouTube Video- Click Here👇


•मुलींसाठी आहे एक च शौचालय-

            200 पेक्षा जास्त मुलींसाठी केवळ एकच शौचालय आहे. जेथे मुलींना वाट पाहत ताटकळत थांबावे लागते. काही लहान मुली कपड्यातच वा वसतीगृहातच घाण करून देतात. म्हणजेच मुलींना नैसर्गिक विधीही दाबून ठेवावी लागत आहे.

•मुलांचेही शौचालय विचित्र अवस्थेत-

शाळा प्रशासन 16 शौचालयचा दावा करते मात्र.... एकही शौचालयात नळ फिटींग नाही. त्यामुळे शौचालयात पाणी नाही. समोरच हौद आहे ज्यात शैवालाचे साम्राज्य आहे..... आणि पाणी वापरण्यासाठी केवळ 2 बादल्या आहेत. त्याही फुटक्या.... विशेष म्हणजे शौचालयाला शोषखड्डाच नाही....

• मुलांचे बाथरूमच नाही-

मुलांना अंघोळीसाठी बाथरूमच नाही....... बाथरूम आहेत ते फक्त सांगायलाच. तुटलेले - फुटलेले जिर्णावस्थेतील. मुले नळाखालीच अंघोळ करतात.... ते नळही 24 तास सुरूच असतात.

•प्रयोगशाळा साहित्याविना- 

10 वी पर्यंत असलेल्या या आश्रमशाळेत प्रयोगशाळेत साहित्य नसल्याची माहिती मिळाली. प्रयोगशाळेची चाबी म्हणे प्रयोगशाळा परिचराने नेली शिरपुरला.


• 10 वी पर्यंतच्या येथील आश्रमशाळेत एकही वृत्तपत्र येत नाही.-

एकंदरीत या आश्रमशाळेची अवस्था गुरांच्या गोठ्यापेक्षा वेगळी नाही. आश्रमशाळा निर्मितिच्या उद्देशालाच या शाळेने हरताळ फासलाय.....मात्र दुर्दैव हे की, येथे आकार घेते ते आदिवासी समाजाचे भविष्य..


_शाळा प्रशासनावर कठोर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला_.


ऊलगुलानातील सहभागी बिरसा क्रांती दलाचे सैनिक - संजय खैरनार बूडकी, वसंत पावरा बोराडी, दिपक पावरा मालकातर, शरद पावरा मालकातर, भूपेश पावरा पो. पा. वकवाड, जगदिश पावरा पो. पा. जामण्यापाडा, गेंद्या पावरा जामण्यापाडा, प्रेम पावरा धवळिविहीर, ईश्वर मोरे लौकी, साहेबराव पावरा हिंगोणीपाडा, मनोज पावरा जोयदा....आदी.



•टीम बिरसा क्रांती दल, शिरपूर_


आज सकाळी नियोजनानुसार मनोज पावरा सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते अनुदानित आश्रम शाळा जळोद येथे  शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो,अचानक आलेल्या नवीन लोकांना पाहुन आश्रम शाळेतील कर्मचारी घाबरले पण आम्ही त्यांना धीर देऊन कार्यवाही साठी सुरुवात केली।आम्ही सर्वप्रथम ज्या मुलाला मारहाण झाली त्याची विचारपूस केली या दरम्यान असे कळले की संबंधीत विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक मंडलिक यांनी निघालेल्या मोर्चात सहभागी का झाला याचा जाब विचारून कानफटात सूज येई पर्यंत मारले सोबत इतर 2 मुलांनाही मारहाण केली,त्या नंतर आम्ही महिला कर्मचारी घेऊन मुलींच्या वसतीगृह जवळ गेलो त्या ठिकाणी फारच वाईट परिस्थिती होती  संडास बाथरूम अगदी घाणेरड्या अवस्थेत , बंद, आणि 200 मुलींसाठी1 संडास तोही घाणेरडा।मुलींसोबत चर्चा केली असता शाळेत चांगली वागणूक मिळत नाही, महिला अधीक्षक संध्याकाळी येतात सकाळी घरी निघून जातात असे माहीत झाले ,याचा अर्थ की दिवसा मुलींच्या संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही,मुली अक्षरशः रडल्या, त्या नंतर आमचा मोर्चा मुलांच्या  निवासस्थान कडे गेला तेथे पण तीच तऱ्हा प्रत्येक वर्गाच्या बांधणी वरून असे वाटायचे की ही शाळा नसून जेल आहे जेथे मुले काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत।भंगार फॅन बिगडलेल्या अवस्थेत आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे असे वाटले।एवढ्या मोठया वर्गात छोटासा बल्ब जो रात्री उजेड देत असेल याची शंकाच वाटली,विद्युतीकरण तुटलेल्या अवस्थेत, वर्गात कोणतेही शैक्षणिक साहित्य नाही व्हरांड्यात लघवी चा घाण वास एवडी मोठी शाळा असूनही पाणी पिण्यासाठी मुलांना चांगली सोय नाही, आशा एक ना अनेक संशय बघत आम्ही माध्यमिक विभागाकडे गेलो तेथे अजून वाईट अवस्था ,संगणक कक्षात एक पण संगणक नाही।समोर प्रयोगशाळा डोकावून पाहिले असता लॅब दयनीय अवस्थेत संबंधित लोकांना विचारले सात लॅब ची किल्ली प्रयोगशाळा परिचर कडे असते असे कडाले आणि विद्यार्थ्यांनी सांगितले की परिचर येतात लॅब मध्ये झोपतात आणि निघून जातात।आजपर्यंत एक ही प्रयोग झाला नाही। वर्गाची अवस्था फार वाईट,सगळ्या वर्गात zero light आणि पंखा नाही।मग प्रश्न हाच मुले अभ्यास कसा करत असतील.

पुढे आम्ही शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलो ,माध्यमिक प्राथमिक मुख्याद्यपक हजर झाले त्यांना विविध प्रकार चे प्रश्न विचारले असता अपेक्षित उत्तरे त्यांना देता येत नव्हते।मित्रहो लिहण्यासारखे बरेच आहे पण मन खिन्न होत आहे की आपल्या आदिवासी मुलांची काय अवस्था केली आहे या bhamtyanni ।सर्व आदिवासी समाजाचे नेततृत्व करणाऱ्या भांडवांना विन्नती एकदा तरी मुलांना न्याय मिळवून द्या.

संजू सर बूडकी, प्रेम पावरा धवळिविहीर, वसंत पावरा बोराडी, दिपक पावरा मालकातर, ईश्वर मोरे लौकी, शरद पावरा मालकातर, भूपेश पावरा पो. पा. वकवाड, जगदिश पावरा पो. पा. जामण्यापाडा, गेंद्या पावरा जामण्यापाडा, साहेबराव पावरा हिंगोणीपाडा, मनोज पावरा जोयदा आदींनी सर्वांनिच प्रशासनाला जबरदस्त धारेवर धरले. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून प्रशासनाला जबरदस्त जाब विचारला. पुढील कार्यवाही सोमवार पासून सुरू होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.