Hot Widget

Type Here to Get Search Results !

बिरसा ब्रिगेड चे संस्थापक सतीश पेंदाम यांच्या धनुष्य बाण देऊन केला सत्कार

बिरसा ब्रिगेड चे संस्थापक सतीश पेंदाम यांच्या धनुष्य बाण देऊन केला सत्कार
बिरसा ब्रिगेड चे संस्थापक सतीश पेंदाम यांच्या धनुष्य बाण देऊन केला सत्कार

शिरपूर: दि.05 डिसेंबर रोजी शिरपुर तालुक्यातील बोराडी येथे श्रीमती रंजना ताई यांच्या निवास स्थानी बिरसा ब्रिगेड ची एक दिवसीय कार्यशाळा पार पडली तेथील मार्गदर्शक बिरसा ब्रिगेड चे संस्थापक आदि सतीश दादा पेंदाम यांचा अनमोल असा मार्गदर्शन लाभले ते काल सेंधवा म.प्र. येथे झालेल्या टंट्या मामा भिल यांच्या मुर्ती स्थापने साठी आले असता खास करून बिरसा ब्रिगेड च्या शिलेदारांनच्या भेटी साठी ते बोराडी येथे आज सकाळी ठीक 9:00 वाजता उपस्थित राहून त्यांनी सर्व समाज बांधवांना व बिरसा ब्रिगेड च्या शिलेदारांना आदिवासी मिशन तयार करण्यास सज्ज केले.

या वेळी बिरसा ब्रिगेड चे सातपुडा विभागध्यक्ष,  सुंदरलाल पावरा, दीपक पावरा (जिल्हा उपाध्यक्ष),भरत पावरा (तालुकाध्यक्ष), सुनील पावरा (उपाध्यक्ष),आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे महिला प्रतिनिधी आप श्रीमती  रंजना ताई पावरा, श्री कालुसिंग पावरा सर यांच्या हस्ते साहेबांना सातपुड्याचे खास हत्यार धन्यष्य व बाण देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.

या वेळी सर्व समाज बांधव बिरसा ब्रिगेड ची जिल्हा टीम, तालुका टीम व गाव निहाय बिरसा ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच परिसरातील पोलिस पाटील, विविध संघटनेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वाई हॉलीबॉल क्लब बोराडीचा दणदणीत विजय

बोराडी: मा. शशांक रंधे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वाई क्लब बोराडीने पुन्हा यश गाठले. वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या युवाशक्ती टुर्लामेंट मध्ये विश्वाई क्लब हॉलीबॉल च्या टिमने वडगाव येथील स्थानिक टीमला 2/15, 7/15 फरकाने विजय मिळवला. टीम मध्ये सहभागी राज गोसावी, राधेश्याम पाटील, दर्शन बडगुजर, यश सोनार, रोहित पाटील, धनंजय पाटील यांनी उत्स्फूर्त खेळाचे दर्शन घडविले, त्यांना प्रोत्साहन म्हणून श्री चंद्रकांत बडगुजर सर, श्री योगेश शहारे सर, श्री मंगेश वानखेडे सर, श्री बदक सर यांनी मार्गदर्शन केले. सर्व टीमचे विश्वाई क्लब बोराडीचे अध्यक्ष तात्या साहेब शशांक जी रंधे यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.