Hot Widget

Type Here to Get Search Results !

शेळी पालन गट योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शेळी पालन गट योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
शेळी पालन गट योजना

शेळी पालन गट योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : आदिवासी विकास विभागातर्फे सन 2016-2017 करीता भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) अंतर्गत पशुपालनसाठी शेळी गट पुरविणे योजनेतंर्गत शेळी गट पुरवठा योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीतील वनहक्क प्रमाणपत्र मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांकडून 22 ऑक्टोंबर 2021 पर्यंत  अर्ज मागविण्यात येत आहेत.

शेळी गट व्यवसायासाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थ्याकडे वनपट्टा प्राप्त प्रमाणपत्र असावे, अर्जासोबत रहिवाशी दाखला, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, आधार कार्ड, ग्रामसभेचा ठराव, छायाचित्र, आधार संलग्न बँक खाते क्रमांक, दारिद्र्य रेषेखालील उत्पन्नाचा दाखला, विधवा महिला, दिव्यांग असल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहील.  पशुपालनासाठी शेळीगटासाठी प्रती लाभार्थी 89 हजार 285 इतके अनुदान डीबीटी पद्धतीने वितरीत करण्यात येईल.

अधिक माहिती व  अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.