Hot Widget

Type Here to Get Search Results !

म्हसावद परिसरातील शेतकरी बांधवानसाठी आनंदाची बातमी

म्हसावद परिसरातील शेतकरी बांधवानसाठी आनंदाची बातमी

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सर्व एकूण 7 सबस्टेशन चा लोढ शहादा तालुक्यातील म्हसावद सबस्टेशनला येणाऱ्या मेन लाईन वर पूर्वी पासुनच देण्यात आला आहे. त्यामुळे म्हसावद सबस्टेशन वरील सर्व 50 ते 55 गाव शिवारात फ़ार डिम वोल्टेज भेटते. त्याच्या परिणामस्वरूप शेतकरी बाधवांच फ़ार नुकसान होत होते पिक जळत होती, डिम व्हॉटेज मुळे मोटारी जळत होत्या. धडगाव तालुक्यातील सुरवानी येथील 132 केव्ही उपकेंद्र याची उभारणी करण्याची सतत मगाणी होती. जेणे करुण शहादा तालुक्यातील 132 केव्ही व म्हसावद सबस्टेशनच्या लोढ़ कमी होईल.

132 केव्ही सुरवाणी धड़गांव च काम संत गतिने चालू असल्याने या वर्षी देखील म्हसावद परिसरातील  केळी,पपई ऊस अशे सर्व बगायतदार शेतकरी पुर्ण पणे  निराश झाले होते , व उन्हाळ्यात पिकांना विजेच्या अभावी पाणी देण्या बाबत अतिशय चिंतेत व हताश झाले होते, उन्हाळ्यात पपई केळी ची लागवड ठ्ठप्प होण्याची भीती सर्वत्र पसरली होती. परंतु मा.आमदार श्री राजेश पाडवी साहेबानी शेतकरी बांधवाची अड़चन लक्षात घेवून मागील 4 महिन्या पासून सतत पाठपुरावा घेवून 132 केव्ही सुरवाणी च काम त्वरित करण्यासाठि महापारेषण चे  मुख्य अभियंता नाशिक यांच्या पाठपुरावा घेतला व 1 मार्च रोजी 132 केव्ही सुरवाणी धड़गांव सूरु झाल.

परंतु धड़गाव तालुक्याच्या लोढ़ घेन्यास पुन्हा उशीर होत असल्याचे लक्षात येताच पुन्हा आमदार मोहदयांनी रोज पाठपुरावा पत्र व्यवहार केला. व आज रोजी धडगाव तालुक्याच्या पुर्ण लोढ़ सुरवाणी 132 केव्ही वर घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हसावद परिसरातील सर्व 50 ते 55 गाव शिवाराच्या विजेची समस्या मार्गी लागली आहे.

म्हसावद परिसरातील शेतकरी बांधवानसाठी आनंदाची बातमी
म्हसावद परिसरातील शेतकरी बांधवानसाठी आनंदाची बातमी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.