Hot Widget

Type Here to Get Search Results !

अनुसूचित जमातीची खोटी जातप्रमाणपत्रे देणा-या व घेणाऱ्या विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे

अनुसूचित जमातीची खोटी जातप्रमाणपत्रे देणा-या व घेणाऱ्या विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेअनुसूचित जमातीची खोटी जातप्रमाणपत्रे देणा-या व घेणाऱ्या विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे

नंदुरबार दि ०६:  रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने मा.सह, आयुक्त सो.अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार येथे निवेदन देण्यात आले व निवेदनात असे म्हटले आहे की अनुसूचित जमातीची खोटी जातप्रमाणपत्रे देणा-या व घेणाऱ्या विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत.

संदर्भ - १) महाराष्ट्र अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती ,विमुक्त जाती,भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे विनियम) अधिनियम २००० .

२) शासन परिपत्रक क्रमांक एसटीसी १००९/प्र.क्र.१६४/का.१० दि.१२ एप्रिल २०१०

३) आदिवासी विकास विभागाचे पत्र क्रमांक एसटीसी २०२०/ प्र.क्र.८० /का १०  दि .२८ जुलै 2020

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये.

आपणास निवेदन सादर करुन आपले लक्ष वेधण्यात येते की, जातपडताळणीचा कायदा झाल्यापासून गेल्या २० वर्षात ज्यांचे जातप्रमाणपत्र अवैध झालेत अशा नामसद्रुश्य जातीच्या व्यक्तीवर अत्यंत नगण्य गुन्हे दाखल झाले असतील. त्यातही ज्या अधिका-याने खोटे जातप्रमाणपत्र दिले त्यांच्यावर तर मुळीच गुन्हा दाखल झालेला नसावा. यामुळे खोटे जातीचे दाखले देणारे व घेणारे यांचे धाडस वाढले आहेत. परिणामतः आदिवासी समाजाच्या सवलती राजेरोसपणे लुटत आहे.

अशा व्यक्ती कायदा धाब्यावर बसवून कायद्याची क्रुर थट्टा करीत आहे. त्यामुळे वरील कायदा व तद्अनुषंगाने शासन परिपत्रक, पत्राचे अनुषंगाने तपासणी समितीकडून जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर, संबंधीत व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश निर्गमित झाल्यानंतर तात्काळ आपल्या अधिनस्त असलेल्या दक्षता पथकातील पोलीस उपअधिक्षकांनी संबंधित पोलीस ठाण्यात अनुसूचित जमातीची खोटे जातप्रमाणपत्र देणा-या व घेणाऱ्या व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी नंदुरबार शहराध्यक्ष गणेश सोनवणे तालुका अध्यक्ष गणपत पाडवी, सचिन फटकार अरुण पाडवी इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.