Hot Widget

Type Here to Get Search Results !

भिल्लांचा उठाव

भिल्लांचा उठाव 

भिल्लांचा उठाव

भिल्ल हे गुजरात व राजस्थान या भागातील मूळ रहिवाशी आणि तेथील जमीनीचे मालक होते. सातपुडा व सह्याद्रीच्या पर्वतामध्ये भिल्लांची वस्ती होती. खानदेशात भिल्लांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती.

उत्तर मराठेशाहीतील अराजकतेचा फायदा भिल्लांनी उचलण्याचे ठरविले. सन १८०३ साली भिल्लांनी खानदेशात लूटमार केली.

सन १८१६ साली भिल्ल मंडळींनी पुन्हा उठाव केला. यावेळी पेंढारी लोकांनी पाठिंबा दिला होता. भिल्लांचा उठाव 

पेशवाईच्या अस्तानंतर खानदेश इंग्रजांकडे आला. खानदेशाचा कारभार कलेक्टर या नात्याने ब्रिग्जकडे सोपविण्यात आल्यावर सर्व परिस्थितीचे निरीक्षण करून या जहागिरी टोळीप्रमुखांना परत करण्या निर्णय ब्रिग्ज व एल्‌फिन्स्टन या दोघांनी घेतला.

‘हिरा‘ नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली इ.स. १८२२ साली पुन्हा बंड झाले. त्याने खानदेशातील ब्रिटिश शासन जवळ जवळ संपविले. कर्नल रॉबिन्सनला भिल्लांच्या बंदोबस्तासाठी पाठविले. त्याने दोन वर्षे परिश्रम करून भिल्लांचा बंदोबस्त केला.

सेवाराम घिसाडी याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी इ.स. १८२५ मध्ये उठाव केला. इंग्रजांकडील अंतापूर शहर लुटले. ले ऑट्रमनला सेवारामाच्या बंदोबस्तासाठी पाठविले होते. त्यांनी सेवारामाला पकडले आणि माफही केले.

इ.स. १८३९ मध्ये खानदेशात तडवी भिल्लांनी उठाव केला. भिल्लांचा उठाव 

इ.स. १८४६ मध्ये ‘जीवे वासवा‘ याने इंग्रजांशी संघर्ष सुरू केला. तो पकडला गेला. इंग्रजांनी त्याला प्रदीर्घ कारावासाची शिक्षा दिली.

कोळ्यांचा उठाव

भिल्ल व रामोशी यांच्यावर इंग्रजी राजवटीत कशी उपासमारीची वेळ आली तशीच या कोळी लोकांवरही आली. आपल्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ही जमात इंग्रजांविरूद्ध संघर्षात उतरली.

रामजी भांगडियाने रामोशांचा आदर्श पुढे घेऊन इ.स. १८२८ मध्ये उठाव सुरू झाला. दोन वर्षापर्यत हा लढा चालू होता. इंग्रजी अधिकारी अलेक्झांडर मॅकिन्टॉश याने कोळ्यांचे बंड मोडून काढण्यात यश मिळविले.

इ.स. १८४४ चा रघू व बापू भांगरे या दोन भावांचा उठाव गाजला. पुण्यातील सरकारी खजिने, कार्यालये व सरकारी बंगले यावर हल्ले करण्यात आले. इ.स. १८४५ साली कोळ्यांनी रामोशांची मदत घेतली. इ.स. १८४४ मध्ये इंग्रज अधिकाऱ्याने रघूला पकडले आणि फासावर लटकाविले. भिल्लांचा उठाव 

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. भिल्ल जमातीचे भारताच्या स्वातंत्र्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे ,तर भिल्ल समाज पूर्ण झुंजार आणि क्रांतिकारी वर्ग आहे .https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/Bhil-Revolutionary-War-ofIndependence.html

    ReplyDelete