Hot Widget

Type Here to Get Search Results !

आदिवासीचा इतिहास भारतातील आदिवासी लोकसंख्या

Tribal Population Of India 2021

आदिवासीचा इतिहास  भारतातील आदिवासी लोकसंख्या -:

         इतिहासाचे पाने आपण चाळायला सुरुवात केली,की एक बाब प्रकर्षाने लक्षात येते,ती म्हणजे आपण वाचत असलेला इतिहास हा जे त्याचा इतिहास आहे. तो ही परिपूर्ण नाही.तसेच बखरकारांना व इतिहासकारांना जसा इतिहास मांडावा लागला तसाच तो लिहिला आहे.ज्यांच्या हाती लेखणी होती .त्यांनी सोईस्कररित्या किंवा त्यांना ज्यांच्या मर्जी संपादन करावयाची होती.त्यांच्याच बाजूने तो लिहिला आहे.त्यामध्ये ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करीत होता त्या वर्गाचे उदात्तीकरण अधिक झाले ,इतकेच नव्हे तर त्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करीत होता. हितसंबध भविष्यामध्ये धोक्यात येणार नाहीत याची अधिक काळजी घेतली असे निश्चितपणे दिसते.जेथे विजयीवीरांच्या इतिहासांची परिस्थिती आहे तर ज्यांचा लढाईत पराभव झाला त्यांच्या  दुदैविलासाला तर पारावरच राहिला नाही.प्रथम त्यांना जे त्यांनी लढाईत मारले व त्यानंतर त्यांना लेखणीबहाधारांनी इतिहासाच्या पानावरून पुसून टाकले.सुरुवातीच्या काळामध्ये मानव समाज टोळ्या टोळ्याने राहत होता.त्यानंतर त्याचे रूपांतर गणराज्यामध्ये झाले.अशी अनेक गणराज्ये आपल्या देशाच्या भूमीवर अस्तित्वात होती असे मानायला भरपूर वाव आहे.

         या भारतभूमीवर अनेक आक्रमण सुरूवातीला झाली त्यामध्ये आर्याच्या आक्रमणाचा प्रामुख्याने विचार करावा लागेल.आर्याच्या मुळ भूमी बद्दल अनेक मते मतांतरे आहेत परंतु सध्याच्या भारतदेशाच्या बाहेरची भूमी त्यांचे मुळ वसतिस्थान होते.यांवर सर्वाचे एकमत व्हायला कोणाचीही हरकत नसावी.आर्याच्या आक्रमणाचे महत्वाचे एक वैशिष्ठ्ये म्हणजे त्यांनी मुळ रहिवाशींना पराभूत करून त्यांच्या मालमत्ता व भूमी आपल्या ताब्यात घेऊन ते हळूहळू याच भूमीपुत्रांना पराभव झाल्यानंतर आश्रयासाठी सुरक्षित स्थळांच्या शोध घेणे भाग पडले.डोंगराळ व दर्‍याखोर्‍यांचा व निबीड अरण्याचा भूभाग या शिवाय अन्न सुरक्षित भाग असने असंभव असल्याने पराभूत भूमीपुत्रांना याच दर्‍याखोर्‍यांचा आश्रय घेतला व उपजीविकाचा साधने दर्‍याखोर्‍यां मध्येच शोधण्याच्या प्रयत्न केला.विदेशी आक्रमणाचे जसजसी लोकसंख्या वाढू लागली तसेच नव्या भूभागावर स्वामित्व गाजवण्याची संधी मिळावी.त्या त्या वेळी त्यांनी मुळ रहिवाशीना अधिकाअधिक दुर्गम भागामध्ये हुसकावून लावले.अशा रीतीने भूभागातील मूळ भूमीपुत्रांना पराभावा नंतर दर्‍याखोर्‍यांच्या आश्रयानेच जगावे लागेल.

         आज या देशामध्ये आदिवासींचा ज्या जाती अस्तित्वात आहेत.त्यांची या भारतभूमी मध्ये अनेक गणतंत्रे अस्तित्वात होती.या आदिवासींच्या या भूभागा वरती सत्ता चालत होती असा निष्कर्ष आपण सहजपणे काढू शकू.गौंड.भिल्ल जमतींच्या राजाचा उल्लेख अनेक ठिकाणी झाला आहे.यामुळे आदिवासीच्या अनेक राज्ये अस्तित्वात होती व येथील मूळ राजे होते यामध्ये कोणाचेही दुमत व्हायला नको.तसेच आता दारींद्र्या मध्ये जगणार्‍या व प्रगत समाजापासून दूर राहणार्‍या आदिवासीना याचा अभिमान वाटायला हवा.

         पुरातन काळापासून या देशामध्ये अनेक लोक विविध धर्मामध्ये व जातीमध्ये विभागले गेले आहे.तसेच या देशामध्ये वर्णव्यवस्था शेकडो वर्षापासून अस्तित्वात असल्यामुळे या व्यवस्थेच्या  ४ वर्ण म्हणजे ब्राह्मण, वैश्य,क्षत्रिय, शूद्र,  रणागणापासून दूरच राहिले. फक्त क्षत्रिय वर्गातील पुरूषांना हातात शस्र घेऊन आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी रणागणावर लढावे लागले,त्यात ही पुन्हा निम्मी संख्या  महिलांची वजा केली तर १/८ लोकच शस्रधारण करून परकीय आक्रमणाच्या मुकाबला करण्याचा अधिकार धारण करीत होते.साहजिकच ७/८ लोकांना तर आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी रणागणावर जाता आले नाही.धर्माच्या व जातीच्या नावाखाली विभागलेल्या समाज,अनेक रूढी –परंपराचा पगडा असलेला समाज त्यामध्ये पुन्हा परकीय आक्रमकाकडे एतदेशीयांपेक्षा त्या वेळच्या परिस्थितीशी तुलना करता प्रगत हत्यारे व प्रभावी हत्यारे व प्रभावी रणनितीचा वापर यामुळे त्यांना परकीय आक्रमनापुढे शरणागती पतकारल्या शिवाय अन्य पर्यायच राहिला नाही.त्याचीच परिणीती एतदेशीयांच्या पराभवा मध्ये झाली.

         परकीय आक्रमणाच्या पुढे याच भूभागावर आप आपली साम्राज्ये कायमस्वरूपी उभारण्याच्या प्रयत्न केला व आपल्या वंश  विस्तार ही करण्याचा प्रयत्न केला. एतदेशीयांना या परकीय राजाच्या साम्राज्यामध्ये त्यांच्या आधिपत्याखाली राहावे लागेल किंवा त्यापैकी काही एतदेशीयांनी दर्‍याखोर्‍यांच्या आश्रयाने जगणे पसंत केले.एखादी पिढी  आपल्यामध्ये काळानुरूप बदल करून नव्या परिस्थितीचा सामना करण्यास असमर्थ ठरली किंवा काळ  सुसंगत सुधारणा करण्यात हयगय केली तर पुढच्या पिढीत त्याचा विपरीत परिणाम होतो.तीच परिस्थिती पुढच्या पिढीत तशीच राहिली तर त्यांचा नाश अटळ ठरतो.वरील बाबी लक्षात घेऊन एखादा कुटुंबाचा आपण विचार केला तर आज ही त्याचे अनेक दाखले आपल्या परिसरामध्ये आपल्याला आढळून येतात.

         आदिवासींच्या विचार यांच्या आधारे केला तर त्यांच्या सध्याच्या परिस्थितीची कारणे आपल्या सहज लक्षात येतात.आपल्या पिढीतील आदिवासी तरुण-तरुणींनी याचा गांभीर्याने विचार करून नव्या परिस्थितीशी यशस्वी रित्या संघर्ष करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे.आपण या भूमीवर एके काळी राजे होतो याचा त्यांनी सार्थ अभिमान बाळगावा,जेणे करून त्यांना पुढील  वाटचालीस ऊर्जा मिळेल तसेच मनोबल ,आत्मसन्मान वाढण्यास मदत होईल. अथक परिश्रम, बुद्धी व कौशल्ये यांच्या आधारे एक वेगळे साम्राज्य कोणत्याही रूपामध्ये असू शकते. उद्योग, व्यापार, तंत्रज्ञान, कौशल्ये, संशोधन या सारख्या किंवा याशिवाय अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवून आपले स्वामित्त्व इतरांना मान्य करायला लावणे हिच नविन साम्राज्याची संकल्पना राहील.हे मिळविणे अशक्यप्राय किंवा असंभव नाही.आपण ध्येयाने प्रेरीत होऊन प्रयत्न केल्यास हे सहज मिळवू शकु असा विश्वास आदिवासींचा नविन पिढीने बाळगायला हवा.

भारतातील सन २०११ च्या जणगणनेनुसार आदिवासींची एकूण लोकसंख्या पुढील प्रमाणे        

  • मध्य प्रदेश -१५३१६७८४
  • ओरिसा- ९५९०७५६
  • महाराष्ट्र- १०५१०२१३
  • राजस्थान- ९२३८५३४
  • छत्तीसगड-७८२२९०२
  • गुजरात-८९१७१७४
  • झारखंड-८६४५०४२
  • आंध्रप्रदेश- ५९१८०७३
  • वेस्टबंगाल-५२९६९५३                                 
  • कर्नाटक-४२४८९८७                                    
  • आसाम- ३८८४३७१                                     
  • मेघालय २५५५८६१                                     
  • नागालँड- १७१०९७३
  • जम्मू  काश्मीर- १४९३२९९
  • त्रिपुरा-११६६८१३
  • बिहार-१३३६५७३                                       
  • मणीपुर-११६७४२२
  • मिझोराम-१०३६११५
  • तामिळनाडू-७९४६९७
  • उत्तरप्रदेश-११३४२७३
  • अरुणाचल प्रदेश-९५१८२१
  • केरळ-४८४८३९
  • हिमाचल प्रदेश-३९२१२६
  • उत्तराखंड-२९१९०३
  • सिक्किम-२०६३६०
  • दादर न. हवेली-१७८५६४                     
  • गोवा-१४९२७५
  • लक्षदीप-६११२०
  • अंदमान निकोबार-२८५३०
  • दमण दिव-15363
  • पंजाब-0                                                 
  • चंदिगड-0                                              
  • हरियाणा-0
  • दिल्ली-0
  • पोंडेचरी-0

सन २०११ च्या जनगणने नुसार भारतातील आदिवासी लोकसंख्या हि १०४५४५७१६ आहेत. त्या पैकी आदिवासी पुरुष हे ५१९९८५०१ एवढी असून आदिवासी महिलांची लोकसंख्या हि ५२५४७२१५ एवढी आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून सुद्धा आदिवासी समाजावर अन्याय व अत्याचार होत आहे. ह्याचे कारणे म्हणजे आदिवासी समाजात शिक्षणाचा अभाव,आदिवासी समाजात एकजूट अथवा संघटित नसणे.आपल्या अधिकाराची जाणीव नसणे.आदिवासी हा भारत देशाचा मुळनिवासी आहे ह्याची जाणीव नसणे,तसेच आदिवासी समाजावर इतर धर्माचे व संस्कृतीचे अतिक्रमण हे कारणे आहेत.

संपादक - आदिवासी नायक, साप्ताहिक वृत्तपत्र  ९५०३९२१४०६

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. khup sunder lekh lihla ahe ani akdewari dilymule ankhi bhardast lekh wattohttps://bhartiyadiwasi.blogspot.com/2022/02/rajyghtna.html

    ReplyDelete