Hot Widget

Type Here to Get Search Results !

1 ऑक्टोबरपासून महत्वाचा 7 नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान निश्चित

1 ऑक्टोबरपासून पेमेंटपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत बदलणार हे 7 नियम

हे नवीन नियम तुम्हाला माहिती नसतील तर आताच जाणून घ्या नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान निश्चित

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामनान्य ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आजच कोणते नियम बदलले आहेत हे जाणून घ्या. 

ऑक्टोबर महिन्यापासून अनेक दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. हे बदल विशेष माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. यामध्ये बँकिंग नियमांपासून एलपीजीच्या किंमतींपर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे. 

पेंन्शन नियमांत बदल

 डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशीं संबंधित नियम बदलण्यात आले आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शन धारकांना जीवन प्रमाण सेंटरवर डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करावं लागणार आहे. याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

ऑटो पेमेंटच्या नियमात बदल

RBIच्या नव्या नियमानुसार ऑटो पेमेंटपूर्वी अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला ऑटो पेमेंटची कल्पना बँकेकडून ग्राहकांना दिली जाणार आहे. ऑटो पेमेंट करण्यापूर्वी, तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म आणि बँकेद्वारे ऑटो पेमेंटबद्दल माहिती दिली जाईल. जर तुम्हाला रिचार्ज चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला ऑटो पेमेंटला परवानगी द्यावी लागेल. ऑटो पेमेंट OTT साठीच नाही तर इतर ठिकाणी देखील तुम्हाला व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा केल्याशिवाय होणार नाही. 
हे नवीन नियम तुम्हाला माहिती नसतील तर आताच जाणून घ्या नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान निश्चित

RBI नं डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी Additional Factor Authentication (AFA) लागू करण्य़ाचे निर्देश दिले आहेत. ही प्रक्रिया ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार बँकांनाही ऑटो पेमेंटपूर्वी ग्राहकांना नोटिफिकेशन द्यावं लागणार आहे. 

1 ऑक्टोबरपासून नाही चालणार जुनं चेकबुक

1 ऑक्टोबरपासून दोन बँका विलीनीकरण होत आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांनी यासंदर्भात माहिती घेणं गरजेचं आहे. 1 ऑक्टोबरपासून 3 बँकेतील ग्राहकांचे चेकबुक आऊटडेटेड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर येत्या 4 दिवसांमध्ये आपलं चेकबुक नवीन घ्या. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 1 ऑक्टोबरपासून अलाहबाद बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचं जुनं चेकबुक चालणार नाही.  1 ऑक्टोबरपूर्वीच नवीन चेकबुक घ्या असं आवाहन सर्व बँकेच्या ग्राहकांना करण्यात आलं आहे. तिन्ही बँकेचा MICR कोड हा 1 ओक्टोबरनंतर ग्राह्य धरला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. तुमच्या जवळच्या बँकेतून तुम्ही चेकबुक घेऊ शकता. 

या बँकेचं ATM होणार बंद

सूर्योदय स्मॉल फाइनेल बँकेनचं ATM 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. या बँकेचे ग्राहक तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ग्राहक सूर्योदय बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डचा वापर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये त्याच्या रोख रक्कम काढण्यासाठी करू शकते. बँकेने सांगितले की ग्राहक इतर बँकिंग सेवांसाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (24X7) वापरू शकतात.

पीएम किसान योजनेसाठी करावं लागणार रजिस्ट्रेशन

तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ डबल घेऊ इच्छीत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी करावं लागणार आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर 2000 ऐवजी तुम्हाला 4000 रुपये मिळू शकतात. 

1 ऑक्टोबरपासून Mutual fund चेही नियम बदलणार आहेत.  ट्रेंडिंग अकाऊंट केवायसी नियम बदलणार असल्याने नागरिकांनी याची माहिती ठेवणं गरजेचं आहे. सिक्योरिटी एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) नं आधी ट्रेंडिंग अकाऊंट इन्वेस्टर्ससाठी केवायसी अनिवार्य केलं होतं. यापूर्वी याची अखेरची तारीख 31 जुलै होती. पण आता मात्र ही तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. यामध्ये पत्ता, नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, इनकम रेंज यांचा समावेश आहे. 

LPG गॅस सिलिंडरच्या दरात होणार बदल

1 ऑक्टोबरपासून LPG गॅस सिलिंडरचे दर बदलणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलतात. त्यामुळे आता हे दर स्थिर राहणार की वाढणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

दारूसंदर्भात मोठा निर्णय

दिल्लीमध्ये 1 ऑक्टोबरपासून दारूची दुकानं बंद केली जाणार आहेत.  तर 16 नोव्हेंबरपर्यंत केवळ सरकारी दुकानातून दारू विक्री करण्यात येईल. 17 नोव्हेंबरपासून नव्या नियमानुसार दुकानं सुरू होतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.