Hot Widget

Type Here to Get Search Results !

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावे

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावे | धनगर समाजातील विदयार्थ्यांनी

#नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन 2021-2022 या आर्थिक वर्षांसाठी धनगर समाजातील भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

धनगर समाजातील भटक्या जमाती -क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंमयोजना लागू केली आहे.या योजनेंअंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये भोजन रक्कम, 12 हजार रुपये निवास भत्ता, 6 हजार रुपये निर्वाह भत्ता, अशी एकूण 43 हजार रुपये वार्षिंक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यात येणार आहे.

 योजनेसाठी शैक्षणिक निकष व पात्रता पुढील प्रमाणे: विद्यार्थी हा धनगर समाजाचा असावा, अर्जासोबत जात वैद्यता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल, विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल. त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिंक उत्पन्न मर्यादा अनुज्ञेय राहील. योजनेसाठी विद्यार्थ्यांचा स्वत:चा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न असावा. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. शैक्षणिक निकषानुसार विद्यार्थी बारावी नंतरचे उत्तच शिक्षण घेत असावा. बारावीत किमान 60 टक्के गुण मिळालेले असावे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 60 टक्के असणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 5 वर्ष योजनेचा लाभ घेता येईल. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त

पंडित दिनदयाळ उपाध्याय होस्टेल योजना

समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.