Hot Widget

Type Here to Get Search Results !

वन हक्क कायद्यांतर्गत आदिवासी समाजाला १४०० हेक्टर जमिनीचे वाटप | Van Haqq Kayda |

वन हक्क कायद्यांतर्गत रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाला १४०० हेक्टर जमिनीचे वाटप

मुंबई : वनहक्क कायद्यांतर्गत वनहक्क जमिनीच्या दस्तऐवजांचे वाटप विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या (ऑनलाईन) उपस्थितीत करण्यात आले. जवळपास ६२६८ आदिवासींना चौदाशे हेक्टर जमीनीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार रवींद्र पाटील, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपवनसंरक्षक श्री.ठाकरे, प्रांताधिकारी श्री. इनामदार उपस्थित होते.  

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, आदिवासी समाजांच्या वनहक्कासंदर्भातल्या जमीन वाटपासाठी सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करत होते. त्याला यश प्राप्त झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते, शासन व प्रशासन या सर्वांनी एकत्रित काम केल्यास मोठी कामेही मार्गी लागतात. या दस्तऐवजामध्ये शेतकऱ्यांच्या पत्नीचेही नाव दाखल करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना दिल्या.

पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, आदिवासींच्या जीवनामध्ये विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरीमध्ये वाढ करणे आवश्यक असून यासाठी शासन स्तरावर आपण पाठपुरावा करत आहोत. आदिवासी समाजाने लसीकरणामध्ये सहभाग वाढवून आपले जीवन आणखीन सुखकर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार रवींद्र पाटील म्हणाले, आदिवासी समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असून आदिवासी लोकांची अनेक वर्षांपासूनची हक्काची मागणी पूर्ण होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरुण शिवकर, साकव संस्था, पेण यांनी केले. ते म्हणाले, आदिवासी समाज आपल्या वन हक्कासंदर्भात सातत्याने आग्रही आहे. जमिनीचे नकाशे तयार करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

वन हक्क कायद्यांतर्गत आदिवासी समाजाला १४०० हेक्टर जमिनीचे वाटप | Van Haqq Kayda |
वन हक्क कायद्यांतर्गत आदिवासी समाजाला १४०० हेक्टर जमिनीचे वाटप | Van Haqq Kayda |

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. वनहक्क कायदा -२००६ .https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/11/wnhkk-wnadhinym-2006.html

    ReplyDelete