Hot Widget

Type Here to Get Search Results !

अपंग युनीट मधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन 'पेसात' करू नये | Birsa Fighters Sangatana Dhule |

अपंग युनीट मधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन 'पेसात' करू नये | Birsa Fighters Sangatana Dhule | 

बिरसा फायटर्सची सीईओ यांच्याकडे मागणी

Adivasi Tv India | प्रतिनिधी, शिरपूर
             धुळे जिल्हा हा अशंत: 5 वी अनुसूची आणि पेसा क्षेत्रात असल्याने जिल्ह्यात पेसा कायद्यानुसार नोकरभरतीचा शासन निर्णय असतांनाही जिल्हा प्रशासन चुकीच्या पद्धतिने अपंग युनीट मधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून पेसातील जागा गोठवण्याचा आरोप करून, होत असलेले समायोजन तत्काळ रद्द करण्याची मागणी बिरसा फायटर्सने बीडीओ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सीईओ यांच्याकडे केली आहे. 

             महामहिम राज्यपाल यांच्या अधिसुचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील सुनिश्चित केलेल्या 16 संवर्गातील पदभरतीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, 5 वी अनुसूची आणि पेसा क्षेत्रासाठी महामहिम राष्ट्रपति, राज्यपाल आणि केंद्र सरकार व राज्य सरकारची विषेश नियमावली आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील अपंग युनीट भरतीतील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन 'पेसा' क्षेत्रात केले जात आहे. ज्यामुळे राज्यपालांच्या अधिसुचनेचे जिल्हा परिषद धुळे कडून खुलेआम उल्लंघन केले जात आहे. तर दुसरीकडे पेसा कायदा पायदळी तुडवून स्थानिक आदिवासी जमातिच्या हक्काच्या सरकारी नोकरीतील जागा हिरावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. निवेदनाद्वारे सदर समायोजन पेसात न करता नॉन पेसात करावे अन्यथा जिल्हा परिषद प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, जिल्हा सचिव साहेबराव पावरा, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, सचिव गेंद्या पावरा, संघटक काकड्या पावरा, छन्ना पावरा उपस्थित होते.
अपंग युनीट मधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन 'पेसात' करू नये  Birsa Fighters Sangatana Dhule
अपंग युनीट मधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन 'पेसात' करू नये | Birsa Fighters Sangatana Dhule |


Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.