Hot Widget

Type Here to Get Search Results !

आदिवासी हिंदू नाहीत! आदिवासी स्वतंत्र धर्म कॉलम कोड ७ जाहीर करण्याची मा. राष्ट्रपतींना मागणी

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी हिंदू नाहीत! आदिवासी स्वतंत्र धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मांढरे नाशिक यांच्यामार्फत मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन

नाशिक: दि 20, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या 2021 च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड 7 जाहीर करावा यासाठी नाशिक जिल्हाधिकारी श्री. सूरज मांढरे यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले. दि 20,10,2020 रोजी देशपातळीवर प्रत्येक राज्यात काम करणाऱ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना संपूर्ण देशातून प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी हिंदू नाहीत! आदिवासी स्वतंत्र धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मांढरे नाशिक यांच्यामार्फत मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन

आदिवासी हिंदू नसून तरीही मनुवादी विचार सरणीच्या लोकांकडून आदिवासींना हिंदू बनविण्याचा प्रयत्न करत आहेत! आणि जबरस्तीने हिंदू बनवत, वनवासी बनवत आहेत. आदिवासी मूलनिवासी आहे. या देशाचा खरा मालक आहे पण या धर्तीचा खरा भूमिपुत्र आह.  तरीही मनुवादी विचार सरणी कडून आदिवासींचं अस्तित्व संपविण्याचं कटकारस्थान चालू आहे. हे हाणून पाडण्यासाठी आदिवासी धर्म कोड कॉलम 7 जाहीर करावा अन्यथा दिल्ली येथे जंतर मंतर वर तीव्र आंदोलन करण्यात येईल यासाठी निवेदन देण्यात आले.
☯️Youtube विडिओ स्वरुपात पाहा👇

त्याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे म राज्य कार्याध्यक्ष गणेश गवळी, उपाध्यक्ष योगेश गावित, म संपर्क प्रमुख दोलत मेमाणे, उ म. संपर्कप्रमुख आकाश भले, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पाडवी, युवा जिल्हाध्यक्ष (वसतिगृह विभाग) गोकुळ टोंगारे ,नाशिक तालुकाध्यक्ष हिरामन फसाळे, ना जि कार्याध्यक्ष अनिल फसाळे, उ म युवा उपाध्यक्ष सोनू बॅंडकोली, पारधी बाबा, विक्रम पाडवी, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ निंबेकर, तालुकाध्यक्ष शँकर गायकवाड, आप्पा शेवरे ,उ म कर्मचारी विभाग अध्यक्ष महेंद्र झोडगे, लक्ष्मण लोहरे, गोविंद धोंगडे, गोरख रहेरे, शँकर बॅंडकोली, चेतन रानडे, कचरू फसाळे, गणेश घोट व आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.