Hot Widget

Type Here to Get Search Results !

सातपुड्यातील विविध दुर्मिळ बी-बीयांणे प्रदर्शन | बायफ संस्था व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या पुढाकाराने आयोजन

सातपुड्यातील विविध दुर्मिळ बी-बीयांणे प्रदर्शन | बायफ संस्था व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या पुढाकाराने आयोजन

नंदुरबार- धडगाव तालुक्यातील, दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी  ज. पो.वळवी महाविद्यालय धडगाव येथे  महाराष्ट्र जनुक कोष तसेच बायफ संस्था व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,  पारंपारिक बियाणे प्रदर्शन केले.  त्यात विविध संस्थांनी व व्यक्तींनी बियाणे प्रदर्शनात भाग घेतला. त्यात जय जोहार फाऊंडेशन तिनसमाळ संस्थेने बियाणे प्रदर्शित केले आहे.

सातपुड्यातील विविध बी-बीयांणे प्रदर्शनात मांडण्यात आले. त्यात  ज्वारी, दादर, मका, बाजरी, तांदूळ, बट्टी, हाँगरी, मुर, बादी, उडीत, चवडी ,मूग ,भुईमूग, हरभरा, तूर, भेंडी, बेंड्या, ढुनखा ( फुल+बिया), काकडी बिया, चारोळी, ढुल्या /चिपा, चापडू, डुनखा भाजी आदी. बियाणे संकलन करून प्रदर्शनात ठेवले होते. 

प्रदर्शनात अजूनही सातपुडा अन्न/धान्य बी बियाणे जपून ठेवले आहे असे दिसून आले कारण विविध प्रकारचे बी-बियाणे या ठिकाणी स्टॉल वर लावण्यात आले होते. जय जोहार फाऊंडेशन असे विविध उपक्रमात भाग घेत असते व उपक्रम राबवित असते. तसेच तिनसमाळ या ठिकाणी जय जोहार फाऊंडेशन अंतर्गत जोहार आदिवासी संग्रहालय व सातपुडा वनऔषधी संशोधन केंद्र चालू केले आहे. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या /अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी ग्रंथालय चालू करण्यात आलेले आहे.

गावातील व तालुक्यातील लाभार्थी त्याचा लाभ घेत आहेत. आणि विशेष म्हणजे तिनसमाळ हे एक पर्यटन क्षेत्र व थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे ते एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथील आदीवासी लोकजीवन, आदीवासी संस्कृती ,नर्मदा नदीच्या पहारा क्षितिजापर्यंत पाहता येतो व एक कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून ही ओळखले जात आहे. या ठिकाणी जोहार आदीवासी संग्रहालय, अराह-मराह शिखर, नर्मदा नदी, जंगल सफारी, दऱ्या, घाट व ग्रामीण आदीवासी लोकजीवन जवळून पाहता येते. एकदा तरी अवश्य भेट द्या.

सातपुड्यातील विविध दुर्मिळ बी-बीयांणे प्रदर्शन | बायफ संस्था व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या पुढाकाराने आयोजन
सातपुड्यातील विविध दुर्मिळ बी-बीयांणे प्रदर्शन | बायफ संस्था व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या पुढाकाराने आयोजन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.