Hot Widget

Type Here to Get Search Results !

यांना ना आत्महत्या करावीशी वाटते, ना ही दुःख वाट्याला आल्याची खंत आहे | जगण्याची प्रेरणा |

यांना ना आत्महत्या करावीशी वाटते, ना ही दुःख वाट्याला आल्याची खंत आहे | जगण्याची प्रेरणा |

जगण्याची प्रेरणा | टमाट्याची पातळ भाजी.... मसाला नावालाच...  भाजीला जो रंग आलेला तो चटणीमुळे... तेल नसल्यातच जमा... अश्या भाजीत काला मोडून दुपारी 4 वाजता जेवण करणारे हे बाप लेक...

या ऊसतोड कामगाराला आणि त्याच्या मुलाला या कष्टकरी आयुष्यात काही कमी आहे असं वाटत नाही. आपल्यापैकी अनेकांकडे चांगला शिक्षण... चांगलं कुटुंब... चांगली नोकरी...अस भरपूर काही असतानाही, काहीतरी कमी असल्याची खंत, दुःख दिसून येत... 

भगवंताने भरपूर काही दिले असताना आणि छायाचित्रातील या कुटुंबापेक्षा कितीतरी अधिक पटीने आपल्याकडे असतानाही, दुःख व्यक्त करणाऱ्यांनी या ऊसतोड कामगार बाप लेकाचे आयुष्य एकदा पहावं आणि यातून जगण्याची प्रेरणा घ्यावी. 

यांना ना आत्महत्या करावीशी वाटते, ना ही दुःख वाट्याला आल्याची खंत आहे | जगण्याची प्रेरणा |
यांना ना आत्महत्या करावीशी वाटते, ना ही दुःख वाट्याला आल्याची खंत आहे | जगण्याची प्रेरणा |

फोटो स्थळ - सारंगखेडा शेत शिवार, जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.